S M L

अखेर 'पद्मावती' 'पद्मावत' नावानं 25 जानेवारीला होणार रिलीज

अखेर अनेक वादांनंतर 'पद्मावती' हा सिनेमा पद्मावत या नावाने प्रदर्शित होतोय येत्या 25 जानेवारीला. संजय लीला भंसाळी यांचा हा बहुचर्चित सिनेमा अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. पद्मावतला अक्षयकुमारच्या पॅडमॅन या सिनेमाची टक्कर असणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jan 8, 2018 03:43 PM IST

अखेर 'पद्मावती' 'पद्मावत' नावानं 25 जानेवारीला होणार रिलीज

08 जानेवारी : अखेर अनेक वादांनंतर 'पद्मावती' हा सिनेमा पद्मावत या नावाने प्रदर्शित होतोय येत्या 25 जानेवारीला. संजय लीला भंसाळी यांचा हा बहुचर्चित सिनेमा अखेर प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. पद्मावतला अक्षयकुमारच्या पॅडमॅन या सिनेमाची टक्कर असणार आहे.

दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या पद्मावत या सिनेमाला अखेर ग्रीन सिग्नल मिळालाय. कालपासून चित्रपटाच्या प्रदर्शनावर अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या, अखेर 25 जानेवारीला पद्मावत प्रदर्शित होणार असं व्हायाकॉम 18 कडून जाहीर करण्यात आलंय.

त्यामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन पॅडमॅन आणि पद्मावत या दोन सिनेमांनी बॉक्सऑफीस गाजवणार असं दिसतंय. सॅनेटरी नॅपकिन्स हा विषय घेऊन अक्षय कुमारचा पॅडमन येतोय. त्याबद्दलही खूप उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close