उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पाठोपाठ बिहारमध्येही पद्मावतीवर बंदी

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश पाठोपाठ बिहारमध्येही पद्मावतीवर बंदी

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पद्मावतीचा वाद संपेपर्यंत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

29 ऑक्टोबर: उत्तर प्रदेश मध्य प्रदेश पाठोपाठ आता बिहारमध्येही पद्मावतीवर बंदी आणण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पद्मावतीचा वाद संपेपर्यंत पद्मावती सिनेमावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांनी पद्मावतीवर बंदी घातली होती. आता राज्यातही पद्मावतीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.बिहारमधील राजपुत आमदार नीरज कुमार उर्फ बबलू यांनी या सिनेमाचा विरोध केला होता. पद्मावतीला नृत्य करताना दाखवणं योग्य नाही असा आक्षेप घेतला जातो आहे. राजपुत समाजातूनही मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये बंदीची मागणी करण्यात येत होती.

त्यामुळे आता पद्मावतीचा तिढा सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 04:03 PM IST

ताज्या बातम्या