सुप्रीम कोर्टाचा पद्मावतला हिरवा कंदिल; पद्मावत देशभरात रिलीज होणारच

सुप्रीम कोर्टाचा पद्मावतला हिरवा कंदिल; पद्मावत देशभरात रिलीज होणारच

मध्य प्रदेश, राजस्थान सरकारनं पद्मावत ,सिनेमा विरोधात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

  • Share this:

23 जानेवारी : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमा अखेर देशभरात रिलीज होणार आहे. सुप्रीम कोर्टानं पद्मावत सिनेमा विरोधातील याचिका फेटाळली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान सरकारनं पद्मावत ,सिनेमा विरोधात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

सोमवारी करणी सेना आणि राजपूत संघटनांनी पद्मावत सिनेमा विरोधात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये करणी सेनानं असा युक्तिवाद केला होता की, या सिनेमातून रानी पद्मिनीचा अपमान करण्यात आला आहे. पण सुप्रीम कोर्टानं या याचिका फेटाळून पद्मावत सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा केला आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ?

'200 जण रस्त्यावर जमतील आणि राज्य म्हणेल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. हे चालणार नाही. एकदा सेन्सॉर बोर्डानं चित्रपट पास केल्यावर त्याच्यावर कुणीही बंदी घालू शकत नाही. एका विशिष्ट भागात जर समस्या निर्माण झाली, तर तुम्ही आमच्याकडे या.'

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संजय लीली भंसाळी यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. असंच म्हणावं लागेल. पद्मावत सिनेमाबद्दल गाजलेल्या या वादामुळे या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. आता येत्या 25 जानेवारीला हा सिनेमा अखेर आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. त्या दिवशी देशभरातून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

First published: January 23, 2018, 1:48 PM IST

ताज्या बातम्या