'पद्मावत' फेसबुकवर झाला लाईव्ह; हजारो लोकांनी केला शेअर

तुम्ही कधी सिनेमा फेसबुकवर लाईव्ह पाहिला आहे का? पण असं घडलं आहे पद्मावत सिनेमाबाबत. सिनेमागृहात सिनेमा पहायला गेलेल्या लोकांनी हा सिनेमा फेसबुकवर चक्क लाईव्ह केला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2018 06:57 PM IST

'पद्मावत' फेसबुकवर झाला लाईव्ह; हजारो लोकांनी केला शेअर

26 जानेवारी : फेसबुकच्या अनेक लाईव्ह व्हिडिओ आपण सगळ्यांनीच पाहिल्या आहेत. पण तुम्ही कधी सिनेमा फेसबुकवर लाईव्ह पाहिला आहे का? पण असं घडलं आहे पद्मावत सिनेमाबाबत. सिनेमागृहात सिनेमा पहायला गेलेल्या लोकांनी हा सिनेमा फेसबुकवर चक्क लाईव्ह केला. फेसबुकर लाईव्ह केल्या केल्या काही सेकंदातच हा सिनेमा सोशल मीडियावर व्हायरल झाला.

फेसबुकवर किमान 25 मिनिटे हा सिनेमा लाईव्ह दाखवला असल्याचं सांगण्यात येत आहे. 'जाटों का अड्डा' असं नाव असलेल्या फेसबुक पेजवरून हा सिनेमा लाईव्ह करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बरं इतकंच नाही तर 15 हजार लोकांनी हा लाईव्ह सिनेमा शेअर केला आहे. पण कॉपीराईटमुळे आता हा सिनेमा फेसबुक पेजवरून काढून टाकण्यात आला आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत सिनेमा अखेर 25 जानेवारीला रिलीज झाला. पण या सिनेमाच्या संकटांचा डोंगर रिलीज झाल्यानंतरही काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. कारण काही राज्यांत मल्टिप्लेक्स असोसिएशननं घेतलेल्या निर्णयामुळे सिनेमा मल्टिप्लेक्स मध्ये दाखवला जात नाही आहे तर दुसरीकडे इंटरनेटवर हा सिनेमा लीक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांच्या अडचणीत आणखी भर पडली असंच म्हणावं लागेल. पहिल्याच दिवशी इंटरनेवर व्हायरल झाल्यामुळे पद्मावतच्या बॉक्सऑफीस कलेक्शनला फटका बसणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2018 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...