'पद्मावत' आता तामिळ,तेलगूमध्ये होणार रिलीज

'पद्मावत' आता तामिळ,तेलगूमध्ये होणार रिलीज

येत्या 25 जानेवारीला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित बहुचर्चित पद्मावत सिनेमा प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे हिंदी भाषेसह हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही 2डी आणि 3डी रुपात प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

17 जानेवारी : येत्या 25 जानेवारीला संजय लीला भंसाळी दिग्दर्शित बहुचर्चित पद्मावत  सिनेमा प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे हिंदी भाषेसह हा सिनेमा तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही 2डी आणि 3डी रुपात प्रदर्शित होणार आहे.

या भाषेतली पोस्टर्स खुद्द प्रमुख कलाकारांनी म्हणजेच दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली. यामुळे पद्मावत आता साऊथ इंडस्ट्रीतही चर्चेचा विषय ठरलाय. बाहुबलीनंतर हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये प्रदर्शित होणारा बिग बजेट सिनेमा पद्मावत असेल.

First published: January 17, 2018, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading