S M L

'पद्मावत' राजस्थानमध्ये नाही होणार रिलीज, करणी सेनेचा विरोध कायम

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम असून, राजस्थान सरकारनं देखील राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jan 8, 2018 06:26 PM IST

'पद्मावत' राजस्थानमध्ये नाही होणार रिलीज, करणी सेनेचा विरोध कायम

08 जानेवारी : नाव बदललं,  26 दृश्यांना कात्री लावण्याची तयारी दाखवली, सेन्सॉर बोर्डाची अग्निपरीक्षा पार केली, तरी देखील संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटासमोरची संकटं काही केल्या कमी होत नाहीत. करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम असून, राजस्थान सरकारनं देखील राज्यात पद्मावत सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं करणी सिनेमाच्या विरोधापुढे वसुंधरा राजे सरकारनं नमतं घेतलं का असा सवाल उपस्थित केला जातोय.

दरम्यान चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉरच्या सर्व अटी मान्य केल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. 25 जानेवारीला पद्मावत प्रदर्शित होणार आहे. मात्र राजस्थान सरकारच्या भूमिकेमुळं पद्मावत सिनेमासमोर नवं संकट उभं ठाकलंय.

राजपूत करणी सेनाचे संस्थापक लोकेंद्र कालवी म्हणाले, ' जोधा अकबरलाही रिलीजसाठी परवानगी मिळाली होती. पण तो सिनेमा आम्ही राजस्थानमध्ये रिलीज होऊ दिला नाही. आता 'पद्मावत'चंही असंच होणार.'

दीपिका पदुकोण, शाहीद आणि रणवीर यांचा हा पद्मावत 180 कोटींचा बनलाय. त्यामुळे रिलीज करण्यात फार उशीर करून चालणारही नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2018 06:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close