मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Vani Jayaram passes away: पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम काळाच्या पडद्याआड

Vani Jayaram passes away: पद्मभूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध गायिका वाणी जयराम काळाच्या पडद्याआड

 वाणी जयराम

वाणी जयराम

मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 04 फेब्रुवारी :  मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. चेन्नईतील नुंगमबक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या.  वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या मृत्यूचं खरं कारण असून समोर आलं नसून त्यांच्या  कपाळावर जखम झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला असून मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम  या  ७८ वर्षांच्या होत्या. त्यांना पद्मभूषण - भारतातील तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता.

हेही वाचा - Nawazuddin Siddiqui: पत्नीच्या आरोपांनंतर नवाजुद्दीन अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, वाचा संपूर्ण प्रकरण

वाणी जयराम यांनी  विविध उद्योगांमधील काही मोठ्या संगीतकारांसोबत सदाबहार गाणी गायली आहेत. या प्रतिभावान गायिकेने  तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. त्यांनी देशात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर कामगिरी केली आहे. उल्लेखनीय आहे की तिने तीनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. तिला तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा येथून राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.

वाणी जयरामने यांनी  नुकतीच एक व्यावसायिक गायिका म्हणून 50 वर्षे पूर्ण केली होती. त्यांनी आजपर्यंत 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांनी दिग्गज संगीतकारांसह एमएस इलैयाराजा, आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह काम केले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: