मुंबई, 29 जून : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सतत काही ना काही कारणानं चर्चेत असतो. एकीकडे दीपिका पदुकोण निर्मिती क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असतानाच रणवीरही म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये आपलं नशीब आजमावून पाहत आहे. त्यानं नुकतंच त्याच्या म्यूझिक लेबल 'इंकलिंक'चं दुसरं गाणं लाँच केलं. पाठशाला नावानं रिलीज झालेलं हे रॅप साँग देशातल्या शिक्षण पद्धतीवर भाष्य करतं.
अमिषा पटेलला कोर्टाचा समन्स, २.५ कोटी रुपयांची केली फसवणूक
रणवीर सिंग आणि नवजार ईरानी यांनी मिळून हे गाणं लाँच केलं. ज्यात काम भारी (कुणाल पंडागले), स्लो चीता (चैतन्य शर्मा) आणि स्पिटफायर रॅपर (नितिन मिश्रा) यांसारखे रॅप सिंगर आणि हिप हॉप डान्सर यांचा समावेश आहे. पाठशाला या गाण्यातून स्पिटफायर रॅपर (नितिन मिश्रा)ने डेब्यू केला आहे. या गाण्याचा व्हिडिओमध्ये तो गाण्यासोबतच अभिनय करतानाही दिसत आहे. हे गाणं त्याच्या खऱ्या आयुष्यातील घटनाक्रम सांगतं. कशाप्रकारे त्यानं या रूढी अणि बंधनं तोडून स्वतःमधील कलागुण ओळखले.
लग्नाच्या दोन वर्षांनंतरही विराटला इम्प्रेस करण्यासाठी अनुष्काची लंडनमध्ये धडपड
या विषयी बोलताना रणवीर म्हणाला, ‘आपल्या समाजात शिक्षण पद्धती काही ठिकाणी खूपच कठोर आहे. या ठिकणी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचं अनुमान त्यांच्या गुणावरून लावलं जातं आणि मी याच्याशी सहमत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात आणि हे वेळीच ओळखता आले तर ते विद्यार्थी आयुष्यात अनेक असाध्य गोष्टीही साध्य करू शकतात.’
सनी लिओनीला या व्यक्तीने मारली गोळी, क्षणाधार्त जमिनीवर कोसळली!
View this post on Instagram
Young homie too lit 🔥 Pen game too strong 📝 Tera time aa gaya, Nitin 🖤@ntnmshra @incinkrecords
रणवीर सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘83’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. हा सिनेमा 1983 मधील भारतानं वर्ल्डकप जिंकत केलेल्या ऐतिहासिक कामगिरीवर आधारित आहे. ‘83’ मध्ये रणवीर सिंग माझी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग इंग्लंडमध्ये सुरू आहे.
या सिनेमात दीपिका पादुकोण रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. रणवीर आणि दीपिकाचा एकत्र हा चौथा सिनेमा आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते सुद्धा उत्सुक आहेत.
===============================================================
SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?