सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; शेखर कपूर यांनी केली मोठी घोषणा

सुशांतचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; शेखर कपूर यांनी केली मोठी घोषणा

पानी चित्रपट बंद झाल्यानंतर सुशांतला खूप मोठा धक्का बसला होता

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह याच्या मृत्यूमुळे सर्वचजण हैराण आहेत. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याची आठवण काढत आहेत. आता प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शेखर कपूर सुशांत सिंह याला 'पानी' चित्रपट समर्पित करणार असल्याचे सांगितले आहे.

शेखर कपूर यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले – जर तुम्ही देवासह कोणत्या यात्रेत जोडू इच्छिता, तुम्हाला सर्व पाऊले आस्थेने ठेवावी लागतील. देवाची इच्छा असेल तर पानी एकदिवशी नक्की बनेल. मी तो चित्रपट सुशांतला समर्पित करेन.

शेखर कपूर हे यशराज बॅनरअंतर्गत पानी चित्रपटाची निर्मिती करीत होते. या चित्रपटात मुख्य भूमिकेत सुशांत सिंह राजपूत होता. मात्र हा चित्रपट तयार होऊ शकला नाही. या चित्रपटादरम्यान त्याने अनेक मोठ्या बजेट चित्रपटांना नकार दिला होता. सुशांत पानीमध्ये खूप जास्त गुंतला होता. मात्र दुर्देवाने काही अंतर्गत वादामुळे हा चित्रपट पुढे होऊच शकला नाही.

हे वाचा-बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींचं ISI आणि पाक आर्मीशी कनेक्शन; BJP नेत्याच्या आरोप

सुशांतच्या निधनानंतर शेखर कपूर यांनी ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की – मला माहीत आहे तू कोणत्या त्रासातून जात होतास. मी गेल्या 6 महिन्यांमध्ये तुझ्यासोबत असायला हवं होतं. तुझ्यासोबत जे घडलं ते तू मला सांगू शकला असतास.

Published by: Meenal Gangurde
First published: July 22, 2020, 9:06 PM IST

ताज्या बातम्या