News18 Lokmat

ट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट!

यंदाचं बहुचर्चित कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या थांबत नाही आहेत. आणि आता तर काय त्यांच्यावर गिफ्ट्सचा पाऊसच पडतोय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 03:24 PM IST

ट्विटर आणि फोर्ब्सकडून विरुष्काच्या लग्नाला 'असं'ही गिफ्ट!

28 डिसेंबर : यंदाचं बहुचर्चित कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाच्या चर्चा काही केल्या थांबत नाही आहेत. आणि आता तर काय त्यांच्यावर गिफ्ट्सचा पाऊसच पडतोय. एकीकडे ट्विटरकडून अनुष्काच्या लग्नाच्या ट्विटला 'गोल्डन ट्विट' म्हणून जाहीर करण्यात आलं तर दुसरीकडे फोर्ब्सने 'पेटा पर्सन ऑफ द ईयर' या पुरस्कारानं अनुष्काला सन्मानित करण्यात आलं आहे.

बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातल्या विरुष्का या लाडक्या कपलचं लग्न टॉक ऑफ द टाऊन झालं होतं. अनुष्कानं तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन लग्नाचा पहिला फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. अनुष्कानं लग्नाच्या फोटोसह केलेलं हे ट्विट सर्वाधिक वेळा रिट्विट करण्यात आलं. त्यामुळेच हे ट्विट गोल्डन ट्विट ठरलं असल्याचं ट्विटरकडून घोषित करण्यात आलं आहे. एकुणच काय तर विरुष्काच्या लग्नाला ट्विटरकडूनही अनोखं गिफ्ट मिळालंय असंच म्हणावं लागेल.

विरुष्काच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाचा अनुष्काला आणखी एक खुशखबर मिळाली ती फोर्ब्सकडून. फोर्ब्सने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या 'फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100'च्या यादीत अनुष्काला दुसरं स्थान मिळालं आहे. अनुष्काला 'पेटा पर्सन ऑफ द ईयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अनुष्का शुद्ध शाकाहारी असून तिची प्राण्यांप्रती दयाळू वृत्ती बघूनच तिला या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 03:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...