मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉलिवूडमध्ये Covid-19 चा प्रकोप वाढला; आलिया भट्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

बॉलिवूडमध्ये Covid-19 चा प्रकोप वाढला; आलिया भट्टचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Alia Bhatt Corona Positive:सध्या चित्रपट सृष्टीत कोरोना विषाणूचा विळखा (Corona Outbreak in bollywood) वाढत चालला आहे. अशातचं आलिया भट्टलाही (Alia Bhatt) कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 एप्रिल: सध्या देशभर कोरोना विषाणूची (Corona Virus) दुसरी लाट (2nd Wave) वेगाने पसरत आहे. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अशात चित्रपटसृष्टीतही कोरोना विषाणूचा विळखा (Corona Outbreak in bollywood) वाढत चालला आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, आर. के. माधवन, परेश रावल आणि आमिर खाननंतर आता आलिया भट्टचा (Alia Bhatt) कोरोना विषाणूचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Corona test Positive) आला आहे. त्यामुळे कोविड -19 बॉलिवूडसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

खरंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याची अधिकृत माहिती आलिया भट्टकडून देण्यात आली नाही. मात्र फिल्मफेअरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन आलिया भट्टला कोरोना विषाणूची लागण झाल्याची सांगण्यात आलं आहे. गुरुवारी सायंकाळी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या डबिंग सेशननंतर एकत्र दिसले आहेत. दोघंही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ते दोघंही त्यांच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात झळकणार आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामध्येच आलिया भट्टला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्याने याचा परिणाम चित्रपटाच्या चित्रीकरणावर होऊ शकतो. परणामी चित्रपटाचं शुटींग काही काळासाठी पुढं ढकललं जाऊ शकतं. तत्पूर्वी मिलिंद सोमण, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी, ​​बप्पी लाहिरी आणि सतीश कौशिक अशा विविध कलाकारांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हे ही वाचा- अकराव्या वर्षीच आलियाला जडलं रणबीरवर प्रेम, वाचा कपलची Love Story

याव्यतिरिक्त आलिया भट्ट तिच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'बाहुबली' फेम एस. एस. राजामौली करत आहेत. तर आलिया या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबतच ज्युनियर एनटीआर, अजय देवगन आणि राम चरणसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Corona updates