Home /News /entertainment /

Oscars 2021: एका क्लिकवर पाहा पुरस्कार विजेत्यांची यादी

Oscars 2021: एका क्लिकवर पाहा पुरस्कार विजेत्यांची यादी

दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळं (coronavirus) व्हर्चुअल पद्धतीनं सोहळा पार पडतोय.

    मुंबई 26 एप्रिल: ऑस्कर (Oscars 2021) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या व्यक्तीला जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांच्या पंक्तित स्थान मिळतं. त्यामुळं जगभरातील कलाकार हा पुरस्कार पटकावण्यासाठी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान यंदा या पुरस्काराचं 93वं वर्ष आहे. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळं (coronavirus) व्हर्चुअल पद्धतीनं सोहळा पार पडतोय. तर पाहूया यंदाच्या वर्षी पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कलाकार आहेत तरी कोण?... सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: डॅनियेल कालूया (चित्रपट - 'जुडास एंड द ब्लैक मसीहा) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : युन यू जंग (चित्रपट – मिनारी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: क्लोई झाओ (चित्रपट – नोमेडलँड) 'सोल' सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड मूव्ही बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट: कोलेत बेस्ट डॉक्युमेंट्री फिचर : माय ऑक्टोपस टीचर सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - 'इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू बेस्ट साऊंड - साऊंड ऑफ मेटल सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - टू डिस्टेंस स्ट्रेंजर (ट्रॅव्हन फ्री आणि मार्टिन डेसमंड रो) सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार - अ‍ॅन रॉथ (चित्रपट - 'मा रेनीज ब्लॅक बॉटम)
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Entertainment, Oscar

    पुढील बातम्या