Home /News /entertainment /

बापलेकीच्या नात्याला काळीमा! ऑस्कर विजेत्याच्या मुलीनेच केले लैंगिक शोषणाचे आरोप

बापलेकीच्या नात्याला काळीमा! ऑस्कर विजेत्याच्या मुलीनेच केले लैंगिक शोषणाचे आरोप

ऑस्कर विजेता दिग्दर्शक (Oscar Winner Director) वूडी एलनबद्दल (Woody Allen) एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या मुलीनेचं (Daughter) त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप लावला आहे

    मुंबई, 26 मे: ऑस्कर विजेता दिग्दर्शक (Oscar Winner Director) वूडी एलनबद्दल (Woody Allen)  एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या मुलीनेचं (Daughter) त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा (Sexual Abuse) आरोप लावला आहे. डायलन फेरो (Dailan Fero)  ही त्यांची सावत्र मुलगी आहे. आणि तिने वूडी यांच्यावर बाललैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप करत खळबळ माजवली आहे. नुकताच डायलन फेरो ही the Drew च्या प्रसिद्ध शो ‘द ड्र्यू बेरीमोअर शो’ मध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलताना तिने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी बोलताना डायलननं म्हटलं आहे,’ ती जेव्हा सात वर्षांची होती. तेव्हा तिच्या वडिलांनी म्हणजेच वूडी एलनने तिचं लैंगिक शोषण केलं होतं’. तिच्या या खुलास्यामुळे सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. यावर बोलत वूडीसोबत काम केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. (हे वाचा:‘द फॅमिली मॅन 2’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात, पाहा काय आहे नेमकं प्रकरण  ) दरम्यान वूडी एलन याने आपल्या सावत्र मुलीशी लग्न करत खळबळ माजवली होती. वूडी अनेक वर्षे आपली गर्लफ्रेंड मियासोबत रिलेशनशीपमध्ये होता. आणि या दोघांनी सून यी या मुलीला दत्तक घेतलं होतं. मात्र काही काळानंतर वूडीने आपण आपल्याच मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत मोठा धक्का दिला होता. (हे वाचा:HBD: ..अन् सोहाने सगळा स्वयंपाकच करपवला, अशी झाली कुणालच्या लव्हस्टोरीची सुरुवात) यावर बोलत सून यीने म्हटलं होतं, की मला दत्तक घेतल्यापासूनचं आमच्यामध्ये बाप आणि मुलीसारखं काहीच नव्हत. आमच्यात या भावनाच नव्हत्या. त्यामुळे एकमेकांसोबत लग्न करणं आमच्यासाठी काहीचं वेगळं नव्हतं. मियाला वूडीजवळ आपली मुलगी सून यीचे न्यूड फोटो असल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर ती वूडी पासून विभक्त झाली होती. सून यी व्यतिरिक्त या दोघांनी मोसेज आणि डायलन या दोघांना दत्तक घेतलं होतं. वूडीला तब्बल चार वेळा ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. अशा या नावाजलेल्या दिग्दर्शकाची ही काळी बाजू समोर येताच सर्वत्र खळबळ माजली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या