Covid -19 वर आधारित चित्रपटाची निर्मिती; हा ऑस्कर विजेता करणार दिग्दर्शन

Covid -19 वर आधारित चित्रपटाची निर्मिती; हा ऑस्कर विजेता करणार दिग्दर्शन

चीनमधील वुहानसह अनेक देशांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे

  • Share this:

लॉस एन्जलिंस, 28 जून : ऑस्कर विजेते लेखक चार्ल्स रॅन्डॉल्फ कोविड – 19 या महासाथीवर एक चित्रपट बनवण्याची तयारी करीत आहे. हा चित्रपट चीनमधील वुहान शहरावर आधारित असेल.

रँडोल्फ हा चित्रपट लिहिण्याबरोबरच दिग्दर्शनही करणार आहे. 'डेडलाईन'ने दिलेल्या बातमीनुसार. के. ग्लोबल या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. चीनच्या वैद्यकीय समुदायाला जेव्हा या भयावह विषाणूची माहिती मिळाली त्यादिवसापासून या चित्रपटाची कथा सुरू होईल. या चित्रपटाचं चित्रीकरण चीनसह अनेक देशांमध्ये करण्यात येणार आहे.

हे वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये अभिनेत्यावर आली ही वेळ; भाजी विकून करतोय गुजराण

जगात कोरोनाची अवस्था

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या जगभरात 1 कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

आतापर्यंत जगभरात या विषाणूमुळे पाच लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत 54.58 लाख लोक या साथीने बरे झाले आहेत. कोविड -19 चा सर्वाधिक परिणाम अमेरिकेतील लोकांवर झाला आहे. अमेरिकेत रूग्णांची संख्या 25.96 लाखांवर गेली आहे, तर 1.28 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

अमेरिकेत 26 लाख कोरोना प्रकरणे

हे वाचा-शेवटचा सिनेमा शूट करताना कशी होती सुशांतची अवस्था, आता अभिनेत्रीची होणार चौकशी

अमेरिकेत सुमारे 26 लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ही संख्या स्पेन, इटली, जर्मनी आणि फ्रान्स अशा चार देशांमधील रुग्णांच्या एकूण संख्येएवढीच आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानमध्ये एका दिवसात कोरोना संसर्गाची 2,775 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहे.

First published: June 28, 2020, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading