मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Naatu Naatu फेम संगीतकार MM Keervani यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

Naatu Naatu फेम संगीतकार MM Keervani यांना कोरोनाची लागण, डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

'नाटू नाटू' फेम एमएम किरवानींना कोरोनाची लागण.

'नाटू नाटू' फेम एमएम किरवानींना कोरोनाची लागण.

MM Keerwani Covid News: देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 28 मार्च- देशामध्ये पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढताना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सेलिब्रेटींचासुद्धा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर लोकप्रिय अभिनेत्री किरण खेर यांना कोरोनाची लग्न झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता ऑस्कर विजेत्या 'नाटू नाटू' गाण्याचे संगीतकार एमएम किरवानी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.

नुकतंच ई टाईम्सशी संवाद साधत त्यांनी म्हटलं की, अफाट प्रवास आणि उत्साह याचा विपरीत परिणाम म्हणजे आज मला कोरोनाची लागण झाली आहे. मी कोरोनाबाधित असून माझं मेडिकेशन सुरु आहे. डॉक्टरांनी मला सध्या बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे'. असं म्हणत त्यांनी माहिती दिली आहे.

ऑस्कर आपल्या नावावर करत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्थरावर उंचावणाऱ्या 'नाटू नाटू'बाबत बोलताना त्यांनी म्हटलं, 'हे जे सर्वकाही घडलं ते आमच्या विश्वासाच्या पलीकडचं आहे. इथून पुढेही आम्ही अंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावण्याचा प्रयत्न करणार. 'नाटू नाटू'आता एक आंतराराष्ट्रीय गाणं बनलं आहे'.

(हे वाचा: Akshaye Khanna B'day: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत होणार होतं अक्षयचं लग्न, 'ती' ठरली अडचण, आजही अविवाहित आहे अभिनेता )

एमएम किरवानी हे साऊथ इंडस्ट्रीतील एक अतिशय लोकप्रिय संगीतकार आहेत.त्यांना संगीतात सतत नवनवीन प्रयोग करायला आवडतात. त्यांनी 'नाटू नाटू'च्या संगीताबाबत बोलताना सांगितलं की, त्यांनी आपलं कोणतंही संगीत रिपीट केलेलं नाहीय. त्यांना असं करायला अजिबात आवडत नाही. ते म्हणाले कितीही मोठी ऑफर असली तरी मी असं करणार नाही.

यंदाचा ऑस्कर सोहळा भारतीयांसाठी फारच खास ठरला. या सोहळ्यात देशाला दोन ऑस्कर प्राप्त झाले आहेत. त्यातील एक म्हणजे 'आरआरआर' मधील नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हे साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्यु. एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं आज आंतराष्ट्रीय स्तरावर धुमाकूळ घालत आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Entertainment, South film