आॅस्करसाठी आसामी ' व्हिलेज राॅकस्टार'ची आॅफिशियल एन्ट्री, मराठी सिनेमाची निवड नाही

आॅस्करसाठी आसामी ' व्हिलेज राॅकस्टार'ची आॅफिशियल एन्ट्री, मराठी सिनेमाची निवड नाही

मराठी बोगदा, न्यूड, गुलाबजाम हे सिनेमे शर्यतीत होते. पण यावेळी आॅस्करसाठी एकही मराठी सिनेमा निवडला गेला नाहीय.

  • Share this:

मुंबई, 22 सप्टेंबर : 91व्या आॅस्कर पुरस्कारासाठी भारताकडून आसामी सिनेमा व्हिलेज राॅकस्टारची निवड झालीय. भारताकडून या सिनेमाची आॅफिशियल एन्ट्री होतेय.  मराठी बोगदा, न्यूड, गुलाबजाम हे सिनेमे शर्यतीत होते. पण यावेळी आॅस्करसाठी एकही मराठी सिनेमा निवडला गेला नाहीय.

आॅस्करसाठी यावेळी 29 सिनेमे शर्यतीत होते. पद्मावत, राजी, आॅक्टोबर, लव्ह सोनिया, 102 नाॅट आॅऊट, मान्टो या हिंदी सिनेमांचीही आॅस्करसाठी पाठवणी झाली नाही.

व्हिलेज राॅकस्टारला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं होतं. या सिनेमानं सुवर्णपदक पटकावलं होतं. जिओ मामि फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं होतं. आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये हा सिनेमा दाखवला गेला होता. आतापर्यंत सिनेमाला 44 अॅवाॅर्ड्स मिळालेत.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आॅस्कर ज्युरी सदस्य अनंत महादेवन म्हणाले, ' व्हिलेज राॅकस्टार हा सिनेमा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनलाय. त्याची आॅस्करसाठी निवड केली गेली, याचा मला अभिमान आहे.'

व्हिलेज राॅकस्टार ही गोष्ट आहे धनूची. 10 वर्षांची धनू सगळ्या संकटांना तोंड देत आपलं गिटार घेण्याचं स्वप्न कसं पूर्ण करतेय, हे सिनेमात दाखवलंय.

गेल्या वेळी गॅरी ओल्डमन यांना ड डार्केस्ट अवर या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचं ऑस्कर मिळालं. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फ्रान्सेस मॅकडॉरमेन्टला 'थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी'साठी आॅस्कर मिळालं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत गिलेरमो डेल टोरो.  'द शेप ऑफ वाॅटर' सिनेमासाठी. तर द शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीही आॅस्कर मिळालाय.

डंकर्कला आतापर्यंत ३ ऑस्कर मिळाले आहेत. रॉजर डिकीन्स यांना आजवर 14 वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण यंदा पहिल्यांदाच  त्यांनी ब्लेड रनर सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफीला पुरस्कार मिळालाय.

आॅस्कर सोहळा पुढच्या वर्षी 24 फेब्रुवारीला संपन्न होईल. ही एन्ट्री जरी भारताकडून झाली असली, तरी वैयक्तिकरित्या निर्माते आपल्या सिनेमांची एंट्री आॅस्करसाठी करू शकतात.

VIDEO: 'पवारांनी फसवाफसवी केली तर आम्ही बघून घेऊ', उदयनराजेंची थेट धमकी

First published: September 22, 2018, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading