Oscar Award ची नामांकनं जाहीर, यंदा ‘जोकर’चा दबदबा

Oscar Award ची नामांकनं जाहीर, यंदा ‘जोकर’चा दबदबा

सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या Oscar Award नामांकनाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी : सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'Oscar Award' नामांकनाची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार यादीत ‘जोकर’ चित्रपटाचा दबदबा असल्याचे दिसून येत आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोकर' या चित्रपटातील मुख्य अभिनेता जोकीन फिनिक्स याने आपल्या अभिनयाच्या जोरावर जोकरची व्यक्तीरेखा एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यांच्या अभिनयाची चमक 'Oscar' वरही उमटली आहे. जोकर या चित्रपटाला तब्बल 9 मानांकने मिळाली आहेत. याव्यतिरिक्त 'Once Upon a Time in Hollywood' आणि 'The Irishman' या चित्रपटांनीदेखील Oscar Award मध्ये बाजी मारली आहे.

‘जोकर’ला ११ विभागात नामांकने :

'जोकर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्ले, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट साउंड मिक्सिंग, सर्वोत्कृष्ट पोशाख, बेस्ट साउंड एडिटिंग, बेस्ट फिल्म एडिटिंग आणि सर्वोत्कृष्ट मेकअप या 11 विभागांमध्ये जोकर चित्रपटाने नामांकने पटकावली आहे.

87 वर्षांच्या जॉन विलियम्स यांना 'स्टार वॉर्स : द राईस ऑफ स्कायवॉकर' या चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार या विभागात नामांकन मिळाले आहे. त्यांचे हे 52 वे ऑस्करचे नामांकन आहे. 1971 साली त्यांना 'फिडर ऑन द रुफ' या गाण्यासाठी पहिला ऑस्कर मिळाला होता. आपल्या संगीच्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल 5 पुरस्कार पटकावले आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: January 14, 2020, 2:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading