मुंबई, 24 जानेवारी: यंदाच्या 95व्या ऑस्कर अवॉर्ड 2023ची नामांकन यादी जाहीर झाली आहे. एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमातून नाटू नाटू या गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळालं आहे. नाटूनाटू हे गाणं बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीसाठी नॉमिनेट झालं आहे. नाटू नाटू या गाण्यानं लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकलं आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळाणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे. ट्विटवर #NaatuNaatuForOscars ट्रेंड होत आहे. सिनेमाचं आणि गाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नाटू नाटू हे गाणं अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 2022मध्ये नाटूनाटू गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती. नाटू नाटू या गाण्याला काही दिवसांआधीच होल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला.
This year's Original Song nominees are music to our ears. #Oscars #Oscars95 pic.twitter.com/peKQmFD9Uh
— The Academy (@TheAcademy) January 24, 2023
बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीसाठी नॉमिनेशन मिळालेल्या लिस्टमध्ये RRRच्या नाटू नाटू गाण्यासह पाच गाण्यांची नावं आहेत. RRRसह शॉनक सेन यांची डॉक्युमेंट्री फिचर फिल्म ऑल दॅट ब्रीड्सला देखील ऑस्कर नॉमिनेशन मिळालं आहे. त्याचप्रमाणे गुनीत मोंगी दिग्दर्शिक द एलिफन्ट व्हिस्परर्स ही डॉक्युमेंट्री देखील ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाली आहे.
आरआरआर या सिनेमाचं दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं आहे. तर नाटू नाटू या गाण्याचे शब्द चंद्रबोस यांनी लिहिले आहेत. तसंच गाण्याला म्युझिक एमएम किरावनी यांनी दिलं आहे. सिनेमात अभिनेता राम चरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरण हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. 2022मध्ये रिलीज झालेल्या आरआरआर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड कमाई केली. 1200 करोडहून अधिक रुपये कमावले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: South actress, South film