S M L

आधी डोळा मारला आता किस्सिंग गन शाॅट, प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल

हा क्रश अजून कमी झाला नाही तेच आता या सिनेमाचा टिझर रिलीज झालंय. या टिझरमध्येही प्रियाने धम्माल उडवून दिलीये.

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2018 10:40 PM IST

आधी डोळा मारला आता किस्सिंग गन शाॅट, प्रियाचा नवा व्हिडिओ व्हायरल

13 फेब्रुवारी : व्हॅलेन्टाईन डे या प्रेमळ आठवड्यात प्रेमी युगुलांच्या भरतंय आलंय. अशातच भर पडली ती प्रिया वॉरियरची...तिने डोळा मारून अवघ्या तरुणाईला घायाळ केलं. आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तिने किस्स करून जो गन शाॅट लगावलाय त्याने तरुणांची झोप उडवलीये.

'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर...आता हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या ह्रदयात कोरलं गेलंय.

या सिनेमातील एक गाणं ज्याचे बोल आहे 'मनिक्या मलराया पूवी' हे युट्यूबवर अपलोड झालं. सुरुवातील या गाण्याची फारशी चर्चा झाली नाही. पण, या गाण्यात प्रियाने भुवय्या उडवून डोळा मारला...बस्स हा व्हिडिओ हा हा म्हणत फेसबुक, टि्वटर, इन्साटाग्रामवर तुफान व्हायरल झाला. जो तो हा व्हिडिओ शेअर करतोय तर कुठे काही जण डीपी ठेवताय.

हा क्रश अजून कमी झाला नाही तेच आता या सिनेमाचा टिझर रिलीज झालंय. या टिझरमध्येही प्रियाने धम्माल उडवून दिलीये. आपल्या प्रियकराला भरवर्गात बोटावर किस्स करून गन शाॅट लगावलाय. हा अवघ्या काही सेकंदाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला सैराटमधील आर्ची आणि परश्याचा वर्गातला सीन नक्की आठवणार एवढं मात्र नक्की...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2018 10:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close