S M L

जेम्स बॉण्डच्या म्युझिक थीमचं मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात

मात्र भारतीय संगीतातून जन्मलेल्या बॉण्ड थीमने संपूर्ण जगाला भुरळ घालणं हे खरंच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळेच संगीतात दडलेलं हे सौंदर्य आपण का जपायला हवं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 3, 2017 09:28 PM IST

जेम्स बॉण्डच्या म्युझिक थीमचं मूळ भारतीय शास्त्रीय संगीतात

03 डिसेंबर: संपूर्ण जगाला भुरळ घातलेला ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बॉण्डबाबत एक खास गोष्ट आता समोर आलीय. आणि ती म्हणजे बॉण्ड थीम ही मूळ संगीतकाराला नक्की कशी सुचली. या थीमचं मुळ भारतीय संगीतात आहे.

ही थीम आजही ऐकली तर अंगावर काटा उभा राहतो. आणि डोळ्यांसमोर उभा राहतो तो 007 म्हणजेच राजबिंडा ब्रिटीश गुप्तहेर जेम्स बॉण्ड. इयन फ्लेमिंग यांच्या पुस्तकातील या गुप्तहेराने आधी हॉलिवूडला आणि त्यानंतर संपूर्ण जगाला आपली भुरळ पाडली. या सिरिजचे तब्बल 26 सिनेमे आजवर बनलेत आणि ते धो धो चाललेतही. मात्र या 26 भागांमध्ये एकच गोष्ट कायम राहिली आणि ती म्हणजे बॉण्ड थीम. मात्र ही थीम ब्रिटीश संगीतकार मॉऩ्टी नॉर्मन यांना कशी सुचली याचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात त्यांनी ही थीम आपल्याला भारतीय शास्त्रीय संगीतावरून सुचली असल्याचं स्वतः सांगितलंय.

पण ही गोष्ट समोर यायला कारणीभूत ठरलाय तो आपला मराठमोळा कलाकार अतुल कुलकर्णी. अतुलला तामिळ सुपरस्टार अजिथने एक व्हिडिओ पाठवला. आणि त्यात ही ट्यून भारतीय संगीतावरून सुचल्याचं सांगण्यात आलं होतं. अतुलने लगेचच हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. आणि त्यासोबत लिहिलं की..

"जगप्रसिद्ध जेम्स बॉण्ड ट्युनचा भारतीय शास्त्रीय संगीताशी संबंध आहे. बॉण्ड थीम रचणा-या संगीतकाराने याबाबतची गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट खरंच अदभुत आहे. हा व्हिडीओ मला माझ्या तमिळ सिनेमातील सहकलाकार अजिथ यांनी पाठवला आहे. धन्यवाद अजिथ सर"

अतुलने शेअर केलेल्या या पोस्टला 20 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केलंय. त्यासोबतच अतुलने शेअर केलेल्या या व्हिडिओत भारतीय वाद्यांमध्ये ही थीम ऐकली तर कशी वाटेल ते ही दाखवण्यात आलंय. जे पाहणं खरंच फार इंटरेस्टींग आहे.

खरं तर संगीताला कुठलंही बंधन आणि सीमा नाहीत असं नेहमीच म्हंटलं जातं. मात्र भारतीय संगीतातून जन्मलेल्या बॉण्ड थीमने संपूर्ण जगाला भुरळ घालणं हे खरंच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळेच संगीतात दडलेलं हे सौंदर्य आपण का जपायला हवं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 09:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close