उत्तर देऊ की नको...! ओपराचा सिक्रेट प्रश्न ऐकून प्रियांका चोप्राला वाटू लागली लाज

उत्तर देऊ की नको...! ओपराचा सिक्रेट प्रश्न ऐकून प्रियांका चोप्राला वाटू लागली लाज

नुकतंच प्रियंकानं ओपरा विनफ्रे (Oprah Winfrey's Interview With Priyanka Chopra) यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई 13 मार्च : चित्रपटसृष्टीतील जोडी प्रियंका आणि निक जोनस सतत चर्चेत असतात. अशात नुकतंच प्रियंकानं ओपरा विनफ्रे (Oprah Winfrey's Interview With Priyanka Chopra) यांना एक मुलाखत दिली. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत प्रियांकाला फॅमिली प्लॅनिंगबद्दल (Family Planning) प्रश्न विचारला गेला आहे. प्रियंका आणि निक यांना याआधीही हा प्रश्न विचारला गेला आहे. दोघंही याविषयी बोलताना अतिशय उत्साहात असतात. अनेकदा तर निकनं असंही म्हटलं आहे, की त्याला लहान मुलं खूप आवडतात आणि त्याला खूप मुलं हवी आहेत. अशात आता पुन्हा एकदा प्रियंकाला विचारल्या गेलेल्या या प्रश्नानं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

ओपरासोबत झालेल्या या खास मुलाखतीचा इन्ट्रोडक्ट्री व्हिडीओ समोर आला आहे. यात प्रियंका आणि ओपरा मस्तीच्या मूडमध्ये असून हसत खेळत बोलताना दिसत आहेत. याच दरम्यान ओपरा प्रियांकाला विचारते, की फॅमिली प्लॅनिंगबद्दल काय विचार आहे. हा प्रश्न ऐकून प्रियांका विचारात पडते. ओपरा विचारते, की तू आणि निक आपलं कुटुंब वाढवण्याच्या विचारात आहात? यावर प्रियांका काय उत्तर देते, हे या व्हिडीओमध्ये दाखवलं नाही. मात्र, हा प्रश्न ऐकून अभिनेत्री विचारात पडते.

ओपरासोबतचा प्रियांकाचा हा बहुप्रतिक्षित व्हिडीओ २० मार्चला डिस्कवरी प्लसवर प्रदर्शित केला जाणार आहे. अशात प्रियांका आणि निकचे चाहते हा संपूर्ण व्हिडीओ पाहाण्यासाठी नक्कीच आतुरतेनं वाट पाहात असणार आहेत. याआधी काही दिवसांपूर्वीच निकनं एक मुलाखत दिली होती. SiriusXM च्या या मुलाखतीत निकला विचारलं गेलं, की त्याला प्रियांका इतरांपेक्षा वेगळी का वाटते? यावेळी उत्तर देताना निक म्हणाला, की माझं आणि प्रियांकाचं मुळ नातं हे मैत्री आहे. प्रियांकासोबतच्या मैत्रीचं किती सहजरित्या प्रेमात रुपांतर झालं, हे निकनं मुलाखतीत सांगितलं.

Published by: Kiran Pharate
First published: March 13, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading