उस्मानाबादमध्ये आज मराठी नाट्य संमेलनाची नांदी

उस्मानाबादमध्ये आज मराठी नाट्य संमेलनाची नांदी

97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उस्मानाबादमध्ये उद्घाटन होतंय.

  • Share this:

21 एप्रिल : 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उस्मानाबादमध्ये उद्घाटन होतंय. उस्मानाबादमध्ये प्रथमच नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेय. उस्मानाबादमधील तुळजाभवानी क्रीडा संकुलाच्या मैदानात सुशोभित करण्यात आलेल्या सुलभा देशपांडे नाट्यनगरीत पुढील तीन दिवस हे संमेलन चालणार आहे.

संध्याकाळी ४ वाजता शहरातील जिजामाता उद्यानातून नाट्य दिंडीस प्रारंभ होईल. संमेलन गीताच्या निनादात रंगकर्मी आणि शालेय विद्यार्थी, तसेच शहरवासीय या दिंडीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यसंमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सांस्कृतिक आणि  शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते, पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, मावळते संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, नवे संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची उपस्थिती राहणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर, ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे, तसेच ‘षडयंत्र’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘नक्षत्रांचे देणे’ आदी कार्यक्रमही होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात २२ एप्रिल रोजी नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

First published: April 21, 2017, 11:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading