Home /News /entertainment /

‘हा काय मूर्खपणा आहे’; BJP च्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला

‘हा काय मूर्खपणा आहे’; BJP च्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला

या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghavan) संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे.

    मुंबई 27 जून: भाजपानं राज्यभरात OBC आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. (BJP to Hold Chakka Jam) मुंबईतील दहिसर-मीरारोड या भागातही प्रदर्शनं केली गेली. या आंदोलनादरम्यान कोरोनाचे सर्व नियम मोडल्याचं दिसून आलं. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंग असण्याचा तर प्रश्नच नव्हता. या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghavan) संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे. “हा काय मुर्खपणा लावला आहे तुम्ही. सर्व राजकीय पक्षांचा एकच अजेंडा दिसतोय. एक अभिनेता देखील दिड तास प्रवास करुन या खेळात सामिल झाला. कृपया असे लाजिरवाणे प्रकार करणं थांबवा. सतसतविवेकबुद्धीचा वापर करा. अन् हा सुरु असलेला चक्का जाम त्वरित थांबवा.” अशा आशयाचं ट्विट करुन सुमित राघवन यानं आपला संताप व्यक्त केला. हे ट्विट त्यानं भाजपा आणि नितिन गडकरी यांना देखील टॅग केलं आहे.  शाहरुख खानचं खरं नाव काय? SRK ला आजी या नावानं मारायची हाक रिल लाईफमध्ये अफूचा व्यवसाय करणारे कालिन भैया झाले NCB चे अँबेसिडर आज राज्यभरात भाजपाचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग भाजपा कार्यकर्त्यांकडून रोखून धरला होता. तर त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. तसेच, पोलिसांकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना आंदोलनाबाबत नोटीसही बजावण्यात आली होती. मात्र, तरी देखील भाजपा कार्यकर्त्यांनी महामार्गावर उतरून एक तास महामार्ग रोखून धरला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: BJP, Bollywood actor, Tweet

    पुढील बातम्या