Home /News /entertainment /

लग्नाआधीच आदित्य नारायण झाला कंगाल; बँकेत फक्त 18000 रुपये शिल्लक

लग्नाआधीच आदित्य नारायण झाला कंगाल; बँकेत फक्त 18000 रुपये शिल्लक

काही दिवसांपूर्वीच आदित्य नारायणने (aditya narayan) आपण या वर्षाअखेर लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र सध्या तो आर्थिक परिस्थितीचा सामना करतो आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम प्रत्येकावर झाला. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत कुणीच याला अपवाद ठरलं नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाची घोषणा करणारा गायक आणि टीव्ही शो होस्ट आदित्य नारायणवरदेखील (aditya narayan) लग्नाआधीच आर्थिक संकट कोसळलं आहे. त्याच्या बँक खात्यात आता फक्त 18000 रुपये शिल्लक राहिले आहेत. बॉलिवूडचे दिग्गज गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा आदित्य नारायण आर्थिक परिस्थितीचा सामना करतो आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपली आर्थिक परिस्थितीत सध्या कशी आहे ते त्याने सांगितलं. लॉकडाऊनमुळे त्याच्या सर्व प्लॅनवर पाणी फेरलं आहे. आपल्याला एक वर्ष काम मिळणार नाही, याचा विचारही आपण केला नव्हता असं तो म्हणाला. त्यामुळे आता आदित्य नारायणची आर्थिक स्थिती खूप खराब झाली आहे. त्याच्याकडे सध्या काम नाही. हे वाचा - सलमान भरतोय अभिनेत्याचे मेडिकल बिल्स, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव दैनंदिन गरजा भागवण्यासाठी त्याने बचत केलेल्या पैशांचा वापर केला. आदित्यने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली होती. लॉकडाऊदरम्यान ते पैसेदेखील काढले. आता त्याच्या बँक खात्यात फक्त 18 हजार रुपयेच बाकी आहेत. जर या महिन्यातही काम मिळालं नाही तर आपल्याला आपली बाईक विकावी लागू शकते, असं त्याने सांगितलं. हे वाचा - 'बाहुबली' अभिनेत्रीने कोरोनाला हरवलं; घरी येताच खास सदस्याने धावत येत मारली मिठी आदित्यने काही दिवसांपूर्वीच आपली गर्लफ्रेंड अभिनेत्री श्वेता अग्रवालसह लग्न करणार असल्याचं जाहीर केलं. या वर्षाच्या अखेरपर्यंत आपण लग्न करणार असल्याचं तो म्हणाला. आदित्य 2010 साली शापित फिल्मदरम्यान श्वेताला भेटला होता. तेव्हापासून दोघं एकत्र आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bollywood, Singer

    पुढील बातम्या