OnePlus चे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर अमिताभचा Samsung फोन झाला खराब

OnePlus चे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर अमिताभचा Samsung फोन झाला खराब

वनप्लस स्मार्टफोन कंपनीचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर अमिताभ बच्चन यांचा सॅमसंगचा स्मार्टफोन खराब झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवरवरून दिली आहे. त्यामुळे आता अमिताभजी सर्वत्र चर्चेत आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांचा स्मार्टफोन खराब झाल्याची बातमी त्यांनी दिली आहे. 12 डिसेंबरला अमिताभ बच्चन यांनी सकाळी 11 वाजता ट्विटवर ही माहिती दिली. अमिताभ यांचे ट्विटरवर जवळपास 60 हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी ट्विटरवरून आपल्या फॉलोअर्सकडून स्मार्टफोन व्यवस्थित करण्याबाबत मदत मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांचा सॅमसंग गॅलक्सी एस-9 स्मार्टफोन खराब झाल्यामुळे त्यांनी ट्विटरवर मदत मागितल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सचे रिप्लाय यायला सुरुवात झाली. अमिताभ बच्चन हे स्वत: वनप्लस सारख्या नामांकित स्मार्टफोनचे ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर आहेत पण ते सॅमसंगचा स्मार्टफोन वापरतात. सॅमसंग एस-9 या स्मार्टफोनची किंमत 62 हजाराहून जास्त आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर म्हणाले होते की, 'माझा सॅमसंग एस-9 फोन काम करत नाही आहे.सॅमसंगचा लोगो मोबाईलच्या स्क्रिनवर आहे आणि तो सारखा चमकत आहे. पण त्यापुढे फोन कामच करत नाही आहे. फक्त सॅमसंगचा लोगो चमकत असल्याने फोन बंद करण्याचा प्रयत्नही केला पण तरीही फोन बंद होत नाही आहे'
अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज माणसांनी सॅमसंगचा फोन खराब असल्याचे दाखवून दिल्यामुळे सॅमसंग कंपनीला त्यावर लगेचच तोडगा काढणं गरजेचं होतं. म्हणून याची दखल घेऊन सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांनी लगेच फोन रिपेअर केला. यानंतर अमिताभ बच्चन यांनी याबबत लगेचच ट्विट करून हेही सांगितलं की फोन रिपेअर करण्यात आला असून आता चालू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 01:52 PM IST

ताज्या बातम्या