वरुण धवनच्या प्रेमात तरुणी, दिली आत्महत्येची धमकी

वरुण धवनच्या प्रेमात तरुणी, दिली आत्महत्येची धमकी

अभिनेता वरुण धवन सध्या मोठ्या संकटात सापडलाय. एका चाहतीने वरुणला थेट आत्महत्या करेन अशी धमकीच दिलीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून वरुणला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बरेच मॅसेज येत होते.

  • Share this:

09 नोव्हेंबर :अभिनेत्यांच्या प्रेमात तरुणी पडतात. त्यांचे फोटोज घरी लावतात, त्यांच्या सिनेमांसाठी जीव टाकतात, शूटिंगच्या ठिकाणी घोटाळत राहतात. हे काही नवं नाही. पण वरुण धवनला आलेला अनुभव काही वेगळाच होता. अभिनेता वरुण धवन सध्या मोठ्या संकटात सापडलाय. एका चाहतीने वरुणला थेट आत्महत्या करेन अशी धमकीच दिलीये. गेल्या बऱ्याच दिवसांपासून वरुणला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून बरेच मॅसेज येत होते.

सतत येणाऱ्या मॅसेजपासून सुटका करुन घेण्यासाठी वरुणने नंबरच ब्लॉक केला. नंतर त्याच चाहतीने अनोळखी नंबरवरून कॉल करून चक्क आत्महत्याच करेन अशी धमकी वरुणला दिली.

या घडलेल्या सारा प्रकारामुळे काही विपरीत घडू नये म्हणून वरुणने सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

बदलापूर, हमटी शर्मा की दुल्हनियाँ, स्टुडंंट आॅफ द इयर या सिनेमांमुळे वरुण धवन जास्त लोकप्रिय झाला.

First published: November 9, 2017, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading