निकच्या घरातली ही व्यक्ती करायची प्रियांकाचा द्वेष, आता असं आहे नातं!

निकच्या घरातली ही व्यक्ती करायची प्रियांकाचा द्वेष, आता असं आहे नातं!

निकच्या जोनसच्या भावाने सांगितलं की, प्रियांकाच्या सासरी एक अशीही व्यक्ती आहे जिला प्रियांका अजिबात आवडायची नाही.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस हे सध्या सर्वांच फेवरेट ग्लोबल कपल आहे. नुकताच या दोघांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. गेल्या वर्षी दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने दणक्यात लग्न केलं. लग्नामध्ये मेहंदी, संगीत, दमदार पार्टी आणि रिसेप्शन असे एक ना दोन अनेक कार्यक्रमांचा समावेश लग्नात होता. मात्र काही दिवंसापूर्वीच निकने सर्वांना बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य केलं. निक म्हणाला की, लग्न करताना अचानक एक असा प्रसंग समोर आला की ज्यामुळे आम्ही लग्न थांबवण्याचा निर्णय घेणार होतो. 'द लेट शो विथ जेम्स कॉर्डन' या रिअलिटी शोमध्ये निकने त्याच्या लग्नाचा हा भन्नाट किस्सा सांगितला.

काही दिवसांपूर्वी या शोमध्ये हजेरी लावलेल्या निकला 'लग्नातील भरमसाठ कार्यक्रम करताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आता हे लग्न थांबवायला हवं?' असा विचित्र प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना निक सुरुवातीला हसला आणि नंतर म्हणाला, 'होय... जेव्हा मी लग्नाचं वाढतं बिल पाहिलं तेव्हा मला खरोखर वाटलं होतं की आता हे थांबवायला हवं.' निकचं हे मजेदार उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

एका इन्स्टा पोस्टसाठी इतके कोटी घेते प्रियांका, जाणून घ्या इतर स्टार्सची कमाई

 

View this post on Instagram

 

Mother’s Day 🙌🏽❤️🎉 miss u @madhumalati @franklinjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

निकच्या जोनसच्या भावाने सांगितलं की, प्रियांकाच्या सासरी एक अशीही व्यक्ती आहे जिला प्रियांका अजिबात आवडायची नाही. एका कार्यक्रमात निकचा भाऊ केविनने सांगितलं की, त्याची छोटी मुलगी वेलेंटिनाला प्रियांका फारशी आवडत नव्हती. तिला प्रियांकासोबत रमायला थोडा वेळ लागला.

लग्नानंतर अवघ्या वर्षभरात ही प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय घटस्फोट, सांगितलं कारण

आता वेलेंटिना प्रियांकासोबत रुळायला लागली आहे, पण सुरुवातीला वेलेंटिनाला प्रियांकासोबत रमायला थोडा वेळ लागला होता. काका पुतणीचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे आधी प्रियांका जेव्हा निकला भेटायची तेव्हा वेलेंटिनाला ते अजिबात आवडायचं नाही. तसेच जेव्हा प्रियांका निकच्या जवळ बसायची तेव्हा वेलेंटिना प्रियांकाला निकपासून दूर करायची. पण नंतर हळूहळू तिला समजायला लागले की आता प्रियांकाही आपल्या घरची सदस्य आहे आणि आता ती आपल्या काकूसोबत एकदम खुश आहे.

हिमांश कोहलीसोबत ब्रेकअपबद्दल नेहा कक्करचा धक्कादायक खुलासा, म्हणाली...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 08:25 AM IST

ताज्या बातम्या