फिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल

फिल्मी फ्रायडे - आज हिंदीत 1 आणि मराठीत 4 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल

आज शुक्रवार आहे. त्यामुळे आज तब्बल 5 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात एक हिंदी आणि चार मराठी सिनेमांचा समावेश आहे.

  • Share this:

18 मे : आज शुक्रवार आहे. त्यामुळे आज तब्बल 5 सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. यात एक हिंदी आणि चार मराठी सिनेमांचा समावेश आहे. त्यामुळे आज सिनेमाघरांमध्ये गर्दी पहायला मिळणार हे नक्की.

आज रिलीज झालेला हिंदी सिनेमा आहे 'हायजॅक'. आकर्ष खुराना दिग्दर्शित या सिनेमात सुमीत व्यास हा मुख्य भूमिकेत आहे. तर त्याच्याशिवाय निपुण धर्माधिकारी आणि अमेय वाघ यांच्याही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवलेला 'रेडू' हा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शशांक शेंडे छाया कदम यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमात एका रेडिओची कथा आपल्याला पहायला मिळेल.

याशिवाय विजू मानेचा 'मंकी बात' हा सिनेमाही आज रिलीज झाला आहे. सुट्टीत लहान मुलांचं मनोरंजन करण्यासाठी या सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय. पुष्कर श्रोत्री भार्गवी चिरमुले आणि अवधूत गुप्ते यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

आज रिलीज झालेला तिसरा सिनेमा आहे 'वाघेऱ्या'. समीर आशा पाटील दिग्दर्शित या सिनेमात किशोर कदम, लीना भागवत, भारत गणेशपुरे, किशोल चौघुले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

याशिवाय 'महासत्ता' हा सिनेमाही आज रिलीज झालाय. त्यामुळे मराठी सिनेचाहत्यांसाठी आज मोठी पर्वणीच असणार आहे. पण या सगळ्यात कोणता सिनेमा जास्त गल्ला कमावतो हे आता येता काळचं सांगेण.

First published: May 18, 2018, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading