मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'मुझसे शादी करोगी' विकी कौशलने सलमान समोरच केलं होतं कतरिनाला प्रपोझ

'मुझसे शादी करोगी' विकी कौशलने सलमान समोरच केलं होतं कतरिनाला प्रपोझ

 विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 8 जुलै : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफचं (Katrina Kaif) बॉडींग हे काही बॉलिवूडसाठी नवं नाही. कधीकाळी एकमेकांना डेट करणारे सलमान आणि कतरिना आता एकमेकांचे अगदी जवळचे मित्र आहे. पण अजूनही त्यांची विशेष चर्चा रंगते. कतरिनाने सलमान नंतर अनेक वर्ष अभिनेता रणबीर कपूरलाही डेट केलं पण चर्चा मात्र सलमान आणि कतरिनाचीच पाहायला मिळाली. आताही एक व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सलमान कतरिना आणि विकी कौशल (Vicky Kaushal) देखील आहे.

एका पुरस्कार सोहळ्या दरम्यानचा विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मंचावर विकी कतरिना आणि कार्तिक आर्यन असे तिघेही आहेत. तेव्हा विकी कतरिनाला काही प्रश्न विचारतो.

'कोणाशीही कर पण लग्नं कर..' तापसीच्या आई बाबांना सतावतेय मुलीच्या लग्नाची चिंता

विकी म्हणतो, “तू चांगला विकी कौशल शोधून लग्नं का करत नाहीस? लग्नाचा सिझन सुरू आहे म्हणून म्हटलं तू पण हाच विचार करत असशील. म्हणून मला वाटलं की विचारावं.”

View this post on Instagram

A post shared by Naughty Foofaji (@foofaji)

यावर कतरिना लगेच उच्चारते की “काय??” तेव्हा विकी “मुझसे शादी कारोगी ..” हे गाणं गातो. त्याचवेळी बॅकग्राऊंडला ‘मुझसे शादी करोगी’ गाणं प्ले होतं तर कॅमेरा हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सलमानवर फिरवला जातो. इतक्यातचं कतरिना उत्तर देते की “हिम्मत नाही है.” सलमान सुरुवातीला हसत असतो नंतर तो बाजूला बसलेल्या बहीण अर्पिताच्या खांद्यावर डोकं ठेवतो.

रणबीर कपूरने केला साखरपुडा? आईच्या वाढदिवशी आलियाला घातली अंगठी

गेल्या वर्षभरापासून कतरिना आणि विकीच्या अफेअर ची चर्चा आहे. अनेकदा ते एकमेकांना भेटताना स्पॉट देखील झाले आहेत. मागील महिन्यात अभिनेता हर्षवर्धन कपूरनेही (Harshvardhan Kapoor) त्यांच्या नात्यावर भाष्य करत ते डेट करत असल्याचं म्हटलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Katrina kaif, Vicky kaushal