Home /News /entertainment /

करण जोहरमुळं बिग बींच्या लेकीवर आली उपाशी झोपण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल थक्क

करण जोहरमुळं बिग बींच्या लेकीवर आली उपाशी झोपण्याची वेळ; कारण ऐकून व्हाल थक्क

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनाला करण जोहरमुळे उपाशी झोपावं लागलं होतं. पाहा काय होता किस्सा.

  मुंबई 25 जून : बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर  (Karan Johar) आणि बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची कन्या श्वेता बच्चन  (Shweta Bacchan) हे लहाणपणापासूनच चांगले मित्र आहेत. अनेकदा ते एकत्र पार्ट्यांमध्ये ही जायचे. त्यातीलच एक किस्सा स्वतः करणने एका कार्यक्रमात सांगीतला होता. तर यामुळे चक्क श्वेताला त्या रात्री उपाशी झोपावं लागलं होतं. श्वेता ही ‘ओब्सेसिव कम्पल्सिव डिसऑर्डर’ची (OCD) ब्रँड अम्बेसेंडर आहे असं करण तिला म्हणतो. याविषयीच करणने श्वेताचा आणि त्याचा एक किस्सा सांगीतला आहे. एकदा करणने श्वेताच्या प्लेटमधील जेवन खाल्लं होतं. एका ठिकाणी दोघेही जेवत असताना करणने श्वेताच्या प्लेटमधील जेवन करणेने खाल्लं पण श्वेताने त्यानवर काहीच न बोलता ती प्लेट तशीच ठेवून दिली होती. व आपल्याला भूक नसल्याचं सांगीतलं होतं.
  View this post on Instagram

  A post shared by S (@shwetabachchan)

  खूप दिवसानंतर स्वतः श्वेतानेच ही माहीती करणला देत सांगीतलं होतं की, त्या दिवशी ती उपाशीच घरी गेली व उपाशीच झोपली होती. त्याचं कारणही श्वेताने सांगीतलं होतं की तिला कोणीही तिच्या प्लेटमधील खाल्लेलं आवडत नाही. आणि त्यामुळे ती उपाशीच राहीली. (Karan Johar Shweta Bacchan friendship)
  View this post on Instagram

  A post shared by S (@shwetabachchan)

  यानंतर करणने त्याच्या दुसऱ्यांच्या प्लेटमधील खाणं या सवयीविषयी देखील सांगितलं होतं. करणच्या म्हणण्यानुसार तो पंजाबी बॅकग्राउंडचा असल्याने असं ताटात खाणं हे अतिशय कॉमन गोष्ट आहे. करणच्या वडिलांनादेखील अशी सवय होती  ज्यात काहीचं गैर नाही असंही करण म्हणाला.

  HBD: बॉलिवूडमधून हळूहळू गायब झाला हा हॅन्डसम अभिनेता; पाहा 'मस्ती' फेम आफताबचा प्रवास

  श्वेताला मात्र ओसीडी असल्याने तिला असं दुसऱ्यांच्या ताटातील खाणं किंवा कोणी तिच्या ताटातील जेवण खाणं तिला पसंत नाही. त्यामुळे श्वेता त्या रात्री जेवलीच नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Karan Johar

  पुढील बातम्या