मुंबई, 8 जानेवारी : केजीएफ चॅप्टर 1 (KGF Chapter 1) या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला कन्नड अभिनेता यशच्या 34व्या वाढदिवशी आज या चित्रपटाचा सिक्वेल केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर (KGF Chapter 2 Teaser) रिलीज करण्यात आला. केजीएफ हा चित्रपट संपूर्ण भारतभरात प्रचंड गाजला. केजीएफने कन्नड चित्रपटसृष्टीत 200 कोटींचा व्यवसाय करणारा पहिल्या चित्रपटाचा मानही मिळवला. त्यामुळे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. सर्व चाहत्यांना आणि यशला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून 8 जानेवारी रोजी यशच्या वाढदिवशी केजीएफ चॅप्टर 2 चा टिझर रिलीज झाला आहे. यशने सोशल मीडियावरुनच टिझर रिलीज झाल्याची घोषणा केली आहे.
“A promise was once made” या शब्दांनी हा टिझर सुरू होतो आणि “That promise will be kept.” या शब्दांनी तो संपतो. पहिल्या भागात मृत्युशय्येवर असलेल्या आपल्या आईला रॉकी वचन देतो की तो गरिबीत मरणार नाही. हेच ते प्रॉमिस आहे. त्याची आठवण टिझरच्या सुरुवातील करून देण्यात आली आहे. हाच पहिल्या भागातला धागा आहे. कन्नड सुपरस्टार रॉकी भाईचे काही सीन्स दाखवून या स्टारला वाढदिवसाच्या “Happy Birthday Rocking Star Yash.” अशा शुभेच्छा देऊन हा टिझर संपतो.
सत्ता संघर्षाची पहिल्या भागातील कथाच या दुसऱ्या भागात दिसते आहे. यशसोबतच संजय दत्त, रविना टंडन आणि श्रीनिधी शेट्टी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारलेल्या दिसत आहेत. रविना लाल रंगाची साडी नेसून दिसतेय, त्यामुळे तिनी राजकीय नेत्याची भूमिका साकारल्याचं स्पष्ट होतंय. संजय दत्त हातात तलवार घेऊन पाठमोरा उभा दिसतोय. या 2 मिनिटं 16 सेंकंदांच्या टिझरने अनेक चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
पहिल्या भागात यशवर प्रेम करणारी श्रीनिधी त्याच भूमिकेत दिसते आहे. ती कुणाचीतरी आतुरतेनी वाट पाहताना दिसते आहे. एका मशिन गनने शांतपणे एका इमारतीसमोरच्या कार उडवून देणारा यश टिझरच्या शेवटी समोर येतो. ‘तुम्ही सगळ्यांनी अधीराच्या भूमिकेला आतापर्यंत दिलेलं प्रेम अवर्णनीय आहे. त्यामुळे #KGF2Teaser शेअर करतोय,’ असा मेसेज लिहून संजय दत्तनी हा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Thank you for the tremendous response & love 🙏❤️ Watch #KGFChapter2Teaser only on @hombalefilms: https://t.co/ygic9rRJum@VKiragandur @TheNameIsYash @prashanth_neel @TandonRaveena @SrinidhiShetty7 @BasrurRavi @bhuvangowda84 @excelmovies pic.twitter.com/XzVXMAD2fc
— Sanjay Dutt (@duttsanjay) January 8, 2021
रिलिजनंतर काही तासांतच व्हिडिओला 16 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. टिझरवरून, पहिल्या भागापेक्षा चॅप्टर 2 अधिक दमदार असल्याचं दिसतं आहे. अद्याप चित्रपटाच्या ट्रेलरबाबत, चित्रपटाच्या रिलीजबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: मनोरंजन