मुंबई, 5 डिसेंबर : साउथ इंडस्ट्रीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजय सेतुपती यांच्या चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला आहे. विजय सेतुपती यांचा आगामी 'विदुथलाई' चित्रपटाच्या सेटवर एका 54 वर्षीय स्टंटमॅनचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय. स्टंटमॅन एस सुरेश विजय सेतुपतीसाठी स्टंट करत असताना त्याचा अपघात झाला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समोर येताच सगळ्यांना मोठा धक्काच बसला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर शोककळा पसरली आहे.
'विदुथलाई' चित्रपटाचे शुटिंग चेन्नईच्या वंदलूरमध्ये सुरू होते. यादरम्यान सुरेश मुख्य स्टंट दिग्दर्शकासोबत असिस्टंट म्हणून काम करत होता. तो स्टंट करत असताना त्याचे को-ऑर्डिनेटरही तिथे उपस्थित होते. चित्रपटातील एका दृश्यानुसार त्याला उंचावरून उडी मारण्याचा स्टंट करायचा होता. शनिवारी स्टंट सीक्वेन्ससाठी सुरेश आणि इतर काही जणांना दोरीने बांधले गेले तेव्हा ट्रेनच्या दुर्घटनेचा भव्य सेट चित्रित केला जात होता. सुरेशला क्रेनने पकडलेल्या दोरीवर सुरक्षित ठेवण्यात आले आणि दृश्य सुरू होताच दोरी तुटली. सुरेश सुमारे 20 फूट उंचावरून पडला आणि त्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.
हेही वाचा - 21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन, अचानक एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का
सेटवर घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेतल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. सुरेश 25 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय होते. तो सुरुवातीपासूनच स्टंटमॅन होता आणि तसाच त्याने या जगाचा निरोप घेतला. विदुथलाई या चित्रपटात सुरीसोबत विजय सेतुपतीही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग दोन भागात होणार होते. मात्र या अपघातामुळे हे शुटिंग रखडलं आहे.
दरम्यान, सुरेश 25 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्टंटमन म्हणून काम करत होते. या अपघातानंतर चित्रपटाचे शूटिंग स्थगित करण्यात आले आहे. यासोबतच सेटवरील या घटनेनंतर पोलिसांनीही खटला सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Entertainment, South film