मुंबई, 24 फेब्रुवारी : बॉलिवूड क्वीन कंगना रणौतनं मणिकर्णिका नंतर तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललितांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 'तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आणि माझ्या आयुष्यातील काही घटना सारख्याच आहेत' असं वक्तव्य कंगनानं केलं होतं. या सिनेमासाठी कंगनानं तब्बल 24 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा 26 जून 2020 ला रिलीज होणार आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. त्यातच या चित्रपटाच्या पहिल्या टीजर वरून तर वादंग निर्माण झाला होता. हा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर कंगना रणौतला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होतं.
‘थलायवी’च्या पहिल्या पोस्टरमध्ये कंगना रणौत जयललितांसारख्याच ग्रीन केपमध्ये दिसली. जेव्हा या सिनेमाची घोषणा झाली आहे. तेव्हा पासून या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. पण पहिलं पोस्टर रिलीज झाल्यावर मात्र सर्वांचीच निराशा झालेली दिसली.
आज कंगनाने जयललिता यांच्या जयंती दिवशी ‘थलायवी’मधील तिचा आणखी एक लूक शेअर केला आहे. यामध्ये ती हुबेहूब जयललिता यांच्यासारखी दिसत आहेत. यामध्ये तिने जयललितांप्रमाणेच लाल-काळ्या काठाची सफेद साडी नेसली आहे. कंगना रणौत टीमने इन्स्टाग्रामवर जयललिता यांचा जुना फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याच सेम लूकमध्ये कंगनाचा देखील फोटो शेअर केला आहे. जयललिता यांची आज 72 वी जयंती आहे. त्यानिमित्त हे दोन्ही फोटो शेअर करण्यात आले आहेत. कंगनाच्या या फोटोबाबत मात्र प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगनाच्या या हुबेहूब लूकची सर्वांनीच प्रशंसा केली आहे.
Here is my first look as Puratchi Thaliavar, Makkal Thilagam MGR in #Thalaivi . A teaser follows at 10.30 am today. Hope u like it 🙏 pic.twitter.com/LjnN6Ybwrw
— arvind swami (@thearvindswami) January 17, 2020
ट्विटरवर कंगनाची बहिण रंगोली चंदेलने देखील कंगनाचा हा लूक शेअर करत तिची स्तुती केली आहे. याआधी ‘थलायवी’मधून अरविंद स्वामी यांचा देखील यांचा लूक देखील समोर आला आहे. एमजी रामाचंद्रन यांच्या भूमिकेत स्वामी दिसणार आहेत.