Home /News /entertainment /

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...! फक्त नाव वाचूनही चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या पुलंची 101वी जयंती, गुगलचीही मानवंदना

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे...! फक्त नाव वाचूनही चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या पुलंची 101वी जयंती, गुगलचीही मानवंदना

पुरुषत्तोम लक्ष्मण देशपांडे किंवा आपल्या सर्वांचे लाडके पुलं- यांची आज 101 वी जयंती आहे. 1919 साली मुंबईत त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तीमत्त्वाने आयुष्यभर सर्वांना केवळ निखळ आनंदच दिला आहे.

  मुंबई, 08 नोव्हेंबर: लिखाणातून, वाचनातून, भाषणातून, बोलण्यातून, वागण्यातून आयुष्यभर इतरांना केवळ आनंद देणाऱ्या 'पुलं'ची आज जयंती. गेल्या वर्षी आपण सर्वांनी पुलंचे (PL Deshpande) जन्मशताब्दी वर्ष साजरे केले. यावर्षी पुलंची 101वी जयंती आहे. 'पुरुषत्तोम लक्ष्मण देशपांडे' या नावाची ख्याती सर्वदूर आहे, आणि आज गुगलने (Google) देखील त्याची दखल घेतली आहे. गुगलने डुडलच्या (Google Doodle) च्या माध्यमातून 'भाईं'ना मानवंदना दिली आहे. मुंबईतील समीर कुलावूर (Sameer Kulavoor) या कलाकाराने त्यांचे हे खास डुडल तयार केले आहे. भाईंच्या अभिनेता, लेखक, पटकथा लेखक, संगीतकार, दिग्दर्शक अशा अनेक रुपांना या डु़डलमधून मानवंदना देण्यात आली आहे. 'मुंबईमध्ये जन्म झाल्याने पुलंच्या साहित्याचा, संगिताचा, लिखाण, सिनेमा आणि सर्वच गोष्टींचा संपर्क येतोच. ते जीवनाचे प्रख्यात निरीक्षक म्हणून परिचित होते आणि त्यांच्या साहित्यिक कृतीतून हे दिसून येते. 'नाच रे मोरा' हे गाणं आम्हाला शाळेत शिकवले होते जे फार लोकप्रिय आहे- मला खूप उशिरा कळले (खूप आश्चर्यकारक आहे) की हे गाणं त्यांनी संगीतबद्ध केले आहे.' अशी प्रतिक्रिया त्यांचे डुडल बनवणाऱ्या समीर यांनी दिली आहे. गुगलकडून 'Doodle'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाडक्या 'भाईं'ना मानवंदना
  गुगलकडून 'Doodle'च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लाडक्या 'भाईं'ना मानवंदना
  मराठी चित्रपट, नाटक, साहित्य इ. सर्वच क्षेत्रं पुलंच्या स्पर्शाने समृद्ध झाली आहेत. पुलं देशपांडे हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यांचा सहवास लाभलेल्या अनेकांना आजही 'पीएल' यांच्या आठवणी सांगताना उर भरून आल्यागत वाटते. आताच्या तरुण पिढीला त्यांची लाइव्ह भाषणं किंवा थेट सहवास लाभला नसला तरी पुस्तकांमधून, व्हिडीओंमधून पुलं सर्वांनाच भेटले. त्यांची काही पुस्तकं तर कधीही उघडावी आणि कुठनही वाचण्यास सुरुवात करावी अशी आहेत, प्रत्येक पान तुम्हाला आनंदच देईल. पुलं यांनी कुबेर, भाग्यरेषा, वंदे मातरम्, गुळाचा गणपती सारख्या अनेक मराठी चित्रपटात देखील काम केले होते. मराठी भाषेव्यतिरिक्त इंग्रजी आणि कन्नड भाषेतही त्यांचे साहित्य प्रसिद्ध करण्यात आले आहे. याशिवाय त्यांनी सिनेमांसाठी पटकथा आणि संवादलेखन देखील केले आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. पुलंना 1990 सालली पद्मभूषण, 1993 मध्ये पुण्यभूषण, 1996 साली पद्मश्री, 1965 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1979 मध्ये संगीत नाटक अकादमी फेलोशिप, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने 1996 साली तर 1987 साली कालिदास सन्मान देऊन गौरवण्यात आले होते. 12 जून 2000 साली पुलंनी अखेरचा श्वास घेतला. मराठी माणसाने नेहमीच पुलं देशपांडेंवर प्रेम केले, आणि आणखी शेकडो वर्ष हे प्रेम अबाधित राहिल यामध्ये अजिबात शंकाच नाही.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या