रणवीर-दीपिकाच्या मुंबईतल्या रिसेप्शनचं कार्ड पाहिलंत का?

रणवीर-दीपिकाच्या मुंबईतल्या रिसेप्शनचं कार्ड पाहिलंत का?

बाॅलिवूडची सुंदर जोडी रणवीर सिंग आणि दीपिका आता बंगळुरूमध्ये आहे. रणवीरच्या सासुरवाडी तर त्याचं जोरदार स्वागत झालं. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईमधल्या सोहळ्याकडे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : बाॅलिवूडची सुंदर जोडी रणवीर सिंग आणि दीपिका आता बंगळुरूमध्ये आहे. रणवीरच्या सासुरवाडी तर त्याचं जोरदार स्वागत झालं. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मुंबईमधल्या सोहळ्याकडे.

दीपवीरचं मुंबईतलं रिसेप्शनही मोठं दणक्यात होणार आहे. ते होणार आहे 1 डिसेंबरला. ग्रँड हयात इथे हा रिसेप्शनचा सोहळा रंगणार आहे. या रिसेप्शनचं कार्ड आम्ही तुमच्यासाठी आणलंय.

या सोहळ्याला तमाम बाॅलिवूड उपस्थित राहणार आहे. सिनेतारकांच्या गर्दीत ही जोडी आणखी खुलून दिसणार आहे. बंगळुरूमध्ये होणाऱ्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला पुन्हा दीपिका-रणवीरने दुर्लक्षित केलं.  या पार्टीमध्ये बॉलिवूडचा एकही कलाकार दिसला नाही. लग्नात हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना आमंत्रण दिलं नव्हतं. पण आता रिसेप्शन पार्टीपासून देखील बॉलिवूडला वंचित ठेवण्यात आलं आहे.

रणवीर आणि दीपिकाने ५० कोटींचा एक बंगला विकत घेतला आहे. सध्या या बंगल्याचं इंटेरिअरचं काम सुरू आहे. यामुळेच दोघांनी दीपिकाच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत घराचं काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत रणवीर आणि दीपिका तिच्याच घरी राहणार आहेत. सध्या दोघंही लग्नानंतर होणाऱ्या रिसेप्शनच्या तयारीत आहेत.

दीपिका-रणवीरनं 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोबाबत त्यांनी खूप गुप्तता पाळली होती. अखेर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

दीपिकाच्या बोटातल्या हिऱ्याच्या अंगठीकडे सगळ्यांचंच लक्ष गेलं. एमराल्ड कट असलेली ही अंगठी सर्वात महाग अंगठी आहे. याची किंमत 2.7 कोटीपर्यंत आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी हा साखरपुड्याचा सोहळा झाला.

दीपवीरचे सुंदर फोटोज सगळीकडे शेअर झाले. आता मुंबईच्या रिसेप्शनला ही जोडी कशी दिसतेय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

First published: November 22, 2018, 10:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading