करिनावहिनीनं असं काही म्हटलं की सोहाला अश्रू आवरेनात!

करिनावहिनीनं असं काही म्हटलं की सोहाला अश्रू आवरेनात!

या प्रकाशनाच्या वेळी करिना कपूरनं असं काही म्हणाली की सोहाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. सैफनं तिला समजावलं, तेव्हा सोहा म्हणाली अश्रूंवर माझा ताबा नाही.

  • Share this:

13 डिसेंबर : आई बनल्यानंतर सोहा अली खानचं आणखी एक प्रमोशन झालंय. ते म्हणजे ती आता लेखिका बनलीय. नुकतंच तिच्या  The Perils of Being Moderately famous या पुस्तकाचं प्रकाशन झालं. याचा अर्थ असा की, प्रसिद्ध होण्याची जबाबदारी. यावेळी अख्खं पतौडी कुटुंब हजर होतं.

या प्रकाशनाच्या वेळी करिना कपूरनं असं काही म्हणाली की सोहाच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. सैफनं तिला समजावलं, तेव्हा सोहा म्हणाली अश्रूंवर माझा ताबा नाही. असं काय म्हणाली करिना?

करिनानं सोहाचं खूप कौतुक केलं. ती म्हणाली, ' सोहा आमच्या घराचा आधार आहे. घरात कुठलीही चांगली-वाईट गोष्ट घडली, तर सोहा सगळ्यांना सांभाळते. तिचे वडील आजारी होते, तेव्हाही तिनं त्यांची खूप काळजी घेतली. मी पण एवढी घेऊ शकले नसते.'

हे ऐकून सोहाला आपले अश्रू आवरेनात. नणंद-भावजयीचं हे नातं पाहून प्रेक्षकही भारावून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2017 04:51 PM IST

ताज्या बातम्या