मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: अमृता खानविलकरच्या डान्सला गीता मॉंची दाद; कमेंट् करत म्हणाली...

VIDEO: अमृता खानविलकरच्या डान्सला गीता मॉंची दाद; कमेंट् करत म्हणाली...

अमृताने नुकताच ‘अमृत कला’ नावाची एक डान्स सिरीज सुरु केली आहे.

अमृताने नुकताच ‘अमृत कला’ नावाची एक डान्स सिरीज सुरु केली आहे.

अमृताने नुकताच ‘अमृत कला’ नावाची एक डान्स सिरीज सुरु केली आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 3 जुलै-  मराठमोळी अभिनेत्री (Actress) अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. त्याचबरोबर ती एक उत्तम डान्सरसुद्धा आहे. सुरुवातीपासूनचं आपण तिच्या डान्सच कौशल्य पाहात आलो आहोत. मात्र नुकताच अमृताने ‘अमृता कला’ नावाची एक डान्स सिरीज सुरु केली आहे. त्यातून तिच्या डान्सचं खरं कौतुक होत आहे. नुकताच अमृताने आशिषच्या जोडीने ‘राझी’ मधील एका गाण्यावर डान्स केलं आहे, आणि त्यावर चक्क गीता मांने (Geeta Maa) कमेंट् करत अमृताचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच एक नवा प्रयोग सुरु केला आहे. आपल्या डान्सचं कौशल्य जोपासण्यासाठी तिनं ‘अमृत कला’ नावाची एक डान्स सिरीज सुरु केली आहे. यामध्ये ती आपल्या कथकची कला चाहत्यांना दाखवत आहे. यामध्ये डान्सर असणारा आशिष पाटील तिला साथ देत आहे. हे दोघेही आपल्या डान्सने चाहत्यांना अगदी खिळवून ठेवत आहेत.

(हे वाचा:16 वर्षानंतर झाला होता घटस्फोट; वाचा आमिर-रीनामध्ये का आला होता दुरावा  )

नुकताच अमृता खानविलकरने ‘राझी’ चित्रपटातील ‘बेटीयां जो ब्याही जाये’ या गाण्यावर कथक करत सर्वांनाचं सरप्राईझ दिलं आहे. व्हाईट कलरच्या पारंपरिक वेशात अमृता आणि आशिषने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहते आणि विविध कलाकारसुद्धा अमृताला कमेंट्स करून त्यांचं कौतुक करत आहेत. मात्र एका कमेंट्ने सर्वांचचं लक्ष वेधलं आहे, ते म्हणजे प्रसिध्द कोरियोग्राफर गीता मां. अमृताला कमेंट् करत त्यानी म्हटलं आहे, ‘सो ग्रेसफूल अँड प्रीटी रे बाबा’ या कमेंटवर रिप्लाय करत अमृतानेही आनंद व्यक्त केला आहे. आणि म्हटलं आहे की हे माझ्यासाठी खुपचं महत्वाचं आहे.

(हे वाचा:VIDEO: माध्यमांसमोर KISS करत केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा  )

अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री तर आहेच. मात्र सध्या ती हिंदीमध्येसुद्धा आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ‘राझी’ चित्रपटातील तिच्या रोलचं खुपचं कौतुकसुद्धा झालं आहे. तसेच ती छोट्या पडद्यावरील ‘खातारों के खिलाडी’ मध्येही झळकली होती. आणि त्यातसुद्धा तिला लोकप्रियता मिळाली होती.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment