OMG VIDEO : सेलिब्रिटींना नाचवणारे डान्सिंग शूज येतात धारावीतल्या या कारखान्यातून!

OMG VIDEO : सेलिब्रिटींना नाचवणारे डान्सिंग शूज येतात धारावीतल्या या कारखान्यातून!

बॉलिवूडचे सिनेमे, टीव्हीवरचे रिअॅलिटी शोज यामध्ये आपण कलाकारांना उंचउंच टाचांचे बूट, सँडल घालून नाचताना बघतो. असं आपल्यालाही नाचता आलं तर? अशी स्वप्नंही बघतो. पण विशिष्ट प्रकारचे शूज घातल्यानंतरच असं नाचता येतं हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : बॉलिवूडचे सिनेमे, टीव्हीवरचे रिअॅलिटी शोज यामध्ये आपण कलाकारांना उंचउंच टाचांचे बूट, सँडल घालून नाचताना बघतो. असं आपल्यालाही नाचता आलं तर? अशी स्वप्नंही बघतो. पण विशिष्ट प्रकारचे शूज घातल्यानंतरच असं नाचता येतं हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल.

सेलिब्रेटीजसाठी असे डान्सिंग शूज बनवणारे एक कलाकार मुंबईतल्या धारावीमध्ये आहेत. त्यांचं नाव आहे, जमिल शाह.

जमिल शाह यांनी त्यांच्या धारावीच्या कारखान्यात अनेक सेलिब्रेटींचे शूज बनवले आहेत. आधी फॅक्टरी वर्कर, मग सिक्युरिटी गार्ड, ट्रेनमध्ये मोबाइलच्या कव्हरची विक्री अशी अनेक कामं केल्यानंतर जमिल शाह आता मात्र सेलिब्रेटी शू मेकर झाले आहेत.

आपल्या या अनोख्या कलेने त्यांनी नच बलिये, झलक दिखला जा अशा रिअॅलिटी शोजमध्ये नाचणाऱ्या कलाकारांना खूश केलं आहे. त्यांच्याकडे बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडचे सेलिब्रिटीही खास शूज बनवण्यासाठी येतात.

ऋतिक रोशनसाठी बनवले शूज

साल्सा, हिपहॉप किंवा झुंबा... नाचाचा कोणताही प्रकार असो त्यासाठी योग्य असे शूज जमिल शाह बनवून देतात. त्यांनी ऋतिक रोशनचे 'मोहेनजोदारो' चित्रपटातले शूजही बनवले आहेत. जमिल शाह यांनी बनवलेल्या शूजवर जेव्हा मेड इन इंडियाचा टॅग लागतो तेव्हा त्यांनाही मोठा अभिमान वाटतो.

धारावीतल्या लेदर इंडस्ट्रीचं जगभरात नाव आहे.त्याच धारावीमध्ये राहणारे जमिल शाह यांनी त्यांच्या कलात्मक बुटांमुळे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

====================================================================================

जवानांच्या आयुष्यावर डोळ्यात पाणी आणणारा परफाॅर्मन्स, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading