Home /News /entertainment /

OMG! घर आहे की शेत? भाज्यांपासून ते फळांपर्यंत, सगळं काही आहे प्रीती झिंटाच्या बागेत

OMG! घर आहे की शेत? भाज्यांपासून ते फळांपर्यंत, सगळं काही आहे प्रीती झिंटाच्या बागेत

अभिनेत्रीच्या घरात केवळ मॉडर्न सोयी सुविधा नाही तर भाज्यांपासुन ते फळांपर्यत सर्वकाही तिथेच तयार होतं.

  मुंबई 3 जुलै : सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची सर्व सोईयुक्त घरं आलीच. पण अभिनेत्री प्रिती झिंटाचं (Preity Zinta) घर पाहिलं आहे का? अभिनेत्रीच्या घरात केवळ मॉडर्न सोयी सुविधा नाही तर भाज्यांपासुन ते फळांपर्यत सर्वकाही तिथेच तयार होतं. (Preity Zinta’s farm) लॉकडाउनमध्ये (Lockdown) अनेकांनी त्यात शहरातील लोकही सामील आहेत, त्यांनी घरीच काही ना काही उगवण्याचा प्रयत्न केला. सेलिब्रिटीही त्यात मागे नाहीत. मागील लॉकडाउन दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) घरातल्या बागेत वांगी पिकवल्याची बातमी आली होती. याशिवाय अनेकांनी हेच उपक्रम गॅलरीतही करून पाहिले आणि अनेकांना त्याचे उत्तम निकालही मिळाले.

  'निगेटिव्ह पब्लिसिटी नको असेल तर 25 लाख द्या'; KRK चा तो ऑडियो झाला लीक

  अभिनेत्री प्रीती झिंटा ने तिच्या बागेत खूप काही पिकवला आहे. नुसतीच फुलझाडे नाहीत तर घरातील उपयोगी आणि कोणत्याही रासायनिक खत, प्रक्रिया रहित ताज्या भाज्या आणि फळं ते ही घरच्या घरी याहून आनंद तो काय? हाच आनंद प्रीती तिच्या व्हिडिओतून दाखवत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Preity G Zinta (@realpz)

  प्रीती तिच्या बागेतील स्टॉबेरी पिकलेली दाखवत आहे. व ती लालसर स्वतःच्या घरी पिकलेली स्टॉबेरी पाहून तिला फारच आनंद झाला आहे. (Stawberry in Preity Zinta’s garden)
  View this post on Instagram

  A post shared by Preity G Zinta (@realpz)

  याआधीही तिने अनेक गोष्टी घरीच उगवल्या होत्या. मागील लॉकडाउनमध्ये तिने सिमला मिरची, टोमॅटो अश्या फळभाज्या घरीच उगवल्या होत्या.
  View this post on Instagram

  A post shared by Preity G Zinta (@realpz)

  याचे अनेक व्हिडिओ प्रीती तिच्या सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला तिच्या चाहत्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळतो. त्यामुळे प्रीतीचं घर हे मीनी फार्मचं आहे असं म्हणायला हरकत नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Entertainment

  पुढील बातम्या