अरे बापरे! प्रियांका चोप्राला व्हायचयं 11 मुलांची आई; प्लानिंगही केलीये सुरू?

अरे बापरे! प्रियांका चोप्राला व्हायचयं 11 मुलांची आई; प्लानिंगही केलीये सुरू?

प्रियांका चोप्राने दिलेल्या उत्तराने सर्वचजण चाट झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी : अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आपल्या बोल्ड अवतारासाठी खूप प्रसिद्ध आहे. ती नेहमी पती निक जोनस  (Nick Jonas) याच्यासोबत असलेल्या नात्याबाबत बोलत असते. प्रियांका चोप्राने एका मुलाखतीत तिला 11 मुलांची आई व्हायचयं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तिचं म्हणणं आहे की, तिला आपल्या मुलांची क्रिकेट टीम बनवायची आहे.

एका वृत्तपत्रासोबत केलेल्या मुलाखतीदरम्यान अनेक प्रश्नांमध्ये तिला किती मुलं हवीत, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रियांका चोप्राने दिलेल्या उत्तराने सर्वचजण चाट झाले. 38 वर्षीय प्रियांका चोप्रा म्हणाली की, तिला 11 मुलं हवी आहेत आणि जोर जोराने हसू लागली. पुढे म्हणाली की, (Priyanka Chopra wants her own Cricket Team) मला क्रिकेट टीम बनवायची आहे. (Priyanka Chopra wants to be mother of 11 children) ज्यामध्ये 11 जणं असतील.  11 मुलांची इच्छा व्यक्त केल्यानंतर ती काहीवेळ थांबली व म्हणाली की, 11 मुलं थोडी जास्त होती. कदाचित मी याबाबत नक्की सांगू शकत नाही. नक्कीच 11 मुलांबद्दल ती विनोदात म्हणाली होती. यादरम्यान प्रियांकाने पती निक जोनससोबत नात्यातील अनेक खासगी गोष्टीही सार्वजनिक केल्या.

हे ही वाचा-तारक मेहताच्या 'या' अभिनेत्रीनं घेतली चमचमती कार, कुटुंबाला दिलं सरप्राइज गिफ्ट

यावर पुढे बोलताना ती म्हणाली की, मला बाळ खूप आवडतात. याशिवाय या मुलातीत तिने पती व तिच्या जडणघडणीतील कल्चरल फरकाबद्दलही मत व्यक्त केलं. ती म्हणते की, भारतीय संस्कृती खूप सहजपणे समोरची गोष्ट स्वीकारते. दोघांमध्ये वयाचं अंतर जास्त असलं तरी त्यामुळे नात्यात फरक पडत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. नात्यात एकमेकांमध्ये फरक  किंवा साम्य शोधण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं  किंवा आवडीनिवडी जाणून घेणं जास्त  महत्त्वाचं असतं. दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये  प्रियंका आणि निक जोनासचा विवाह सोहळा पार पडला. (Priyanka Chopra wants to be mother of 11 children)  ट्विन सेरीमोनीमध्ये दोघांनी एकमेकांशी पाश्चिमात्य पद्धतीने लग्न केले. प्रियंका आणि निकचा विवाह सोहळ्यामध्ये दोन्ही संस्कृतींच्या विधींचे पालन केले गेले.

Published by: Meenal Gangurde
First published: January 12, 2021, 12:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading