Home /News /entertainment /

रोमान्स... थ्रील... आणि मर्डर... पाहा थरारक Malang Trailer

रोमान्स... थ्रील... आणि मर्डर... पाहा थरारक Malang Trailer

मलंग सिनेमाच्या रोमँटिक ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील पाहायला मिळतो.

    मुंबई, 06 जानेवारी : दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री असणारा मलंग हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रसिद्ध झाले होते. या पोस्टरमध्ये दिशा पाटनी आणि आदित्य रॉय कपूरला लिपलॉक किस करताना दिसली होती. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मलंग सिनेमासाठी दिशा आणि आदित्य यांनी खुप मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी दोघांनी अंडर वॉटर किसिंग सीनचे ट्रेनिंगही घेतले होते. एवढेच नाही तर या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिशा आणि आदित्य यांना एक मिनिटला पाण्याखाली रहावे लागले होते. या ट्रेलरमध्ये एक वेगळाच थ्रील पाहायला मिळतो. दिशा-आदित्यची सिझलिंग केमिस्ट्री आणि त्यातील मर्डर मिस्ट्री हे कॉम्बिनेशन असेला हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. या सिनेमात अभिनेता अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'मी प्रेग्नन्ट असेन तर...', पत्रकारच्या प्रश्नावर दीपिका पदुकोण भडकली मोहित सूरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. या चित्रपटात आदित्य, दिशा पाटनी व्यतिरिक्त अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सारा अली खाननं शेअर केला आतापर्यंतचा सर्वात BOLD PHOTO, सोशल मीडियावर धुमाकूळ बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Disha patani

    पुढील बातम्या