Elec-widget

Chicken Curry Law Trailer : आपल्या देशात निर्दोष व्यक्तीला निर्दोष सिद्ध करणं किती अवघड?

Chicken Curry Law Trailer : आपल्या देशात निर्दोष व्यक्तीला निर्दोष सिद्ध करणं किती अवघड?

आपल्या देशात एखाद्या गुन्हेगाराला निर्दोष असल्याचं दाखवणं शक्य आहे, पण निर्दोष व्यक्तीचं निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करणं अशक्य आहे', आशुतोष राणाचा जबरदस्त परफॉर्मन्स अनेक दिवसांनी Chicken Curry Law मध्ये दिसणार आहे. Chicken Curry Law चं official Trailer नुकतंच लाँच झालं.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : 'आपल्या देशात एखाद्या गुन्हेगाराला निर्दोष असल्याचं दाखवणं शक्य आहे, पण निर्दोष व्यक्तीचं निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करणं अशक्य आहे', आशुतोष राणाचा जबरदस्त परफॉर्मन्स अनेक दिवसांनी Chicken Curry Law मध्ये दिसणार आहे. Chicken Curry Law चं official Trailer नुकतंच लाँच झालं. हा कोर्टरूम ड्रामा आशुतोष राणा Ashutosh Rana आणि मकरंद देशपांडे makarand Deshpande यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने रंगणार, असं वाटतंय. एका परकीय बेली डान्सरवर झालेल्या बलात्काराची केस हा या सिनेमाचा विषय आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेची अवस्था दाखवायचा दिग्दर्शकाचा विचार दिसतो.

आशुतोष राणा, मकरंद देशपांडे यांच्याव्यतिरिक्त गणेश पै हा नवा चेहरा व्हिलनच्या रूपात या सिनेमात दिसणार आहे. ही गोष्ट आहे एका बेली डान्सरची. परकीय नागरिक असलेली ही बेली डान्सर भारतीय क्लबमध्ये काम करत असते आणि तिच्यावर बलात्कार होतो. खरा गुन्हेगार वकिलाच्या मदतीने कोर्टात ती देहविक्रय करणारी वेश्या असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्या पीडितेला न्याय मिळतो का, आशुतोष राणाचा वकील कसा युक्तिवाद करतो हे या सिनेमातून उलगडेल. येत्या 9 ऑगस्टला हा चित्रपट रीलिज होणार आहे.

VIDEO : RSS च्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...