Home /News /entertainment /

Tandav : हिंदू देवतांचा अवमान केल्याच्या आरोपांवर वेब सीरिजच्या टीमकडून आली पहिली प्रतिक्रिया

Tandav : हिंदू देवतांचा अवमान केल्याच्या आरोपांवर वेब सीरिजच्या टीमकडून आली पहिली प्रतिक्रिया

देशातील विविध 'तांडव' वेब सीरीज (Taandav Web Series) संबंधित कलाकारांवर (Cast and crew) गुन्हे (FIR) दाखल करण्यात येत आहेत. देशभरातील दर्शकांचा वाढचा रोष पाहता 'तांडव' वेब सीरीजच्या टीमने पहिल्यांच या वादावर प्रतिक्रिया (Statement) दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 जानेवारी: अलीकडेच Amazon Prime Video वर रीलिज झालेल्या  'तांडव' नावाची वेब सीरीजवरून नवा वाद निर्माण झाला आहे. Taandav web series आता OTT प्लॅटफॉर्मवरून काढून घ्यावी असा देशभरात वादंग निर्माण झाला आहे. देशातील विविध ठिकाणी वेब सीरीज संबंधित असणाऱ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशभरातील दर्शकांचा वाढचा रोष पाहता 'तांडव' वेब सीरीजच्या टीमने पहिल्यांच या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक निवेदन काढून भावना दुखावल्या असतील तर दर्शकांची बिनशर्त माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, 'तांडव' या वेब सीरीजवर प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांचं आम्ही बारकाईनं निरीक्षण करीत आहोत. आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा करत असताना  मंत्रालयानं आम्हाला माहिती दिली की, वेब सीरीजच्या विविध बाबींवर मोठ्या प्रमाणात तक्रारी आणि याचिका दाखल केल्या जात आहेत. यातील काही सीन्समुळे दर्शकांच्या भावना दुखावल्या असल्याचं याचिकांमध्ये  म्हटलं आहे.' यावर तांडवच्या टीमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तांडव वेब सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल,  मोहम्मद झिशान अयुब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'तांडव' वेब सीरीजच्या टीमने आपल्या निवेदनात पुढं म्हटलं की, ‘तांडव’ वेब सीरीजचं काम काल्पनिक कथेवर अधारित आहे. यातील कोणताही सीन, व्यक्ती किंवा घटना यातील कोणतंही साम्य निव्वळ योगायोग आहे.  त्यामुळे कोणतीही व्यक्ती, जात, समुदाय, वंश, धर्म, धार्मिक श्रद्धा, तसेच कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष किंवा व्यक्ती, जिवंत किंवा मृत अशा कोणत्याचं घटकाच्या भावना दुखावण्याचा तांडवच्या टीमचा आणि कलाकारांचा हेतू नव्हता. त्यामुळे लोकांनी व्यक्त केलेल्या चिंतेची दखल ‘तांडव’ची टीम आणि कलाकार घेत आहोत. त्यातून जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही बिनशर्त माफी मागतो.' या सीनमुळे वादाला सुरुवात वेब सीरीज तांडवच्या पहिल्या एपिसोडमध्ये 17व्या मिनिटाला दाखवण्यात आलेल्या हिंदू देवी-देवतांवर उपरोधिक विनोद केला आहे. या सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. तसेच महिलांचा अपमान केल्याने वेब सीरीजचा हेतू एका समुदायाच्या धार्मिक भावना भडकवण्याचा आहे, असा आरोपही तांडवच्या टीमवर झाला आहे. या सीरीजचा व्यापक प्रसार समाजासाठी हानिकारक असल्याचं म्हणत, देशातील विविध ठिकाणी या वेब सीरीजविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Web series

    पुढील बातम्या