News18 Lokmat

ओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी प्रिया स्वामीनाथनला पसंती

नेटफ्लिक्ससाठी ते लवकरच एखादी कलाकृतीची निर्मिती करणारेत. या निर्मिती संस्थेतर्फे तयार होणारी कलाकृती आपल्याला करायला मिळावी यासाठी अनेक दिग्दर्शक प्रयत्नशील होते.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 01:42 PM IST

ओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी  प्रिया स्वामीनाथनला पसंती

मुंबई, 06 आॅगस्ट : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा नेहमीच जगाच्या आकर्षणाचा विषय ठरलेत. दोघांचंही व्यक्तिमत्त्व बहुआयामी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि फर्स्ट लेडी हे सर्वसामान्य लोकांच्यात मिसळायचे. त्यांचे प्रश्न समजवून घ्यायचे. ते कलाप्रेमीही आहेत. हे दोघंही सध्या निर्मिती संस्थेच्या कामात व्यस्त आहेत. नेटफ्लिक्ससाठी ते लवकरच एखादी कलाकृतीची निर्मिती करणारेत. या निर्मिती संस्थेतर्फे तयार होणारी कलाकृती आपल्याला करायला मिळावी यासाठी अनेक दिग्दर्शक प्रयत्नशील होते. मात्र या दोघांनी भारतीय वंशाच्या सामाजिक कार्यकर्ती आणि फिल्ममेकर प्रिया स्वामीनाथन यांची निवड केलीय. यापूर्वी तिने न्यूयॉर्कमधील अल्पवयीन देहविक्री करणाऱ्या मुलींवर सिनेमा बनवला होता.

प्रिया स्वामीनाथन भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत. अनेक लघुपटाच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. त्यांनी 2007मध्ये न्यूयाॅर्कमध्ये चालणाऱ्या अल्पवयीन तरुणींच्या वेश्या व्यवसायावर सिनेमा बनवला होता, त्याचं नाव होतं ' व्हेरी यंग गर्ल्स'. अन्नपूर्णा पिक्चर्ससाठीही त्यांनी काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराच्या चळवळीत त्यांनी काम केलं होतं. या सगळ्यांमुळे ओबामांनी तिची निवड केली.

नेटफ्लिक्सनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. ते ओबामांसोबत सिनेमे आणि मालिका बनवणार आहेत. आणि बराक ओबामांची कंपनी संबंधित असल्यामुळे प्रत्येक सिनेमाचा विषय हा सामाजिक दृष्टिकोन असणारा, रोजच्या जीवनाशी निगडित असा आहे.

मिशेल ओबामांचंही एक वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. राष्ट्राध्यक्षांची बायको एवढीच त्यांची ओळख कधी राहिली नव्हती. म्हणून त्यांनी गेल्या वर्षी एक गौप्यस्फोट केला होता.

बराक ओबामा यांनी राष्ट्रअध्यक्षपदी असताना एकच कोट वापरल्याचा गौप्यस्फोट मिशेल ओबामांनी केलाय. समाजातच्या दांभिकपणावर त्या बोलत होत्या.मी घातलेला प्रत्येक ड्रेस, फुटवेअर सगळ्यावर टिप्पणी व्हायची. पण बराक ओबामा 8 वर्षं एकच कोट घालत होते, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही आणि हे खरंच धक्कादायक आहे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...