मुंबई, 05 ऑक्टोबर : अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुसरतच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. नुसरत ‘जनहित में जारी’ (Janhit Mein Jaari) या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ती जखमी झाली आहे. या चित्रपटातील गाण्याचा सीक्वेंस चित्रीत करताना नुसरतचा पाय मुरगळला. यानंतर नुसरतला डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले आहे.
प्रोडक्शन यूनिटच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. सेटवर होळीच्या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते. मात्र डान्स करताना अचानक नुसरतचा पाय मुरगळला. सुरूवातीला तिला वाटले की ब्रेक घेऊन लगेच चित्रीकरणास सुरूवात करावी. कारण तिच्यामुळे सर्व क्रू मेंबर्सना देखील काम थांबवावे लागणार होते. मात्र चेक-अप केल्यानंतर डॉक्टरांनी नुसरतला तीन ते चार दिवस आराम करण्याचा सल्ला दिला.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी या गाण्यासाठी भव्य असा सेटअप तयार केला आहे. नुसरतच्या डाक्टरांनी सांगितले की, तिला काही दिवस पायांना आराम मिळावा म्हणून विश्रांतीची गरज आहे. त्यामुळेच चित्रीकरण थांबवले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुसरत जोपर्यंत पूर्णपणे ठीक होत नाही तोपर्यंत आराम घेण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
यापूर्वी नुसरतोबत सेटवर अशाप्रकारची दुर्घटना घ़़डलेली आहे. यापूर्वी दिेखील चित्रीकरणावेळी नुसरत सेटवर बेशुद्ध झाली होती. यानंतर तिला ताबडतोब रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी तिच्या अशा बेशुद्ध पडण्याचे कारण डॉक्टरांनी ब्लड प्रेशर सांगितले होते. ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे नुसरत सेटवरच कोसळली होती. त्यावेळी देखील नुसरतला पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. आता देखील नुसरतला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
वाचा :VIDEO - नऊवारी साडीत Bend over; मराठमोळ्या लूकमध्ये रूचिरा जाधवचे इंग्रजी गाण्यावर ठुमके
‘जनहित में जारी’ हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात नुसरत एक ‘कंडोम विक्री कार्यकारी’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात नुसरत एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका साकारणार आहे. ती शिक्षित आणि हुशार मुलगी आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. त्यानंतर तिला कंडोम तयार करणार्या कंपनीत ‘सेल्स अॅंड प्रमोशन कार्यकारी’ म्हणून नोकरी मिळते. मेडिकल स्टोअर पासून दुसऱ्या अनेक ठिकाणी कंडोम विकायला जाताना नुसरत समोर कोणती कोणती संकटं येतात, या विषयी या चित्रपटाची पटकथा आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत. तर, राज आणि नुसरत दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. या आधी त्यांनी ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.