मुंबई 24 जुलै: अभिनेत्री क्रिती सेननची (Kriti Sanon) बहिण नुपूर सेनन (Nupur Sanon) ही देखील आता चर्चेत राहू लागली आहे. गेल्या काही काळात ती अनेक म्युझिक अल्बममध्ये (Music Album) झळकताना दिसली. परिणामी तिचा फॅन फॉलोइंग बहिणीप्रमाणेच वाढू लागला आहे. चाहते तिची प्रत्येक अपटडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. याच दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगितला. एका तरुणानं प्रेमाचं नाटक करून तिची फसवणूक केली होती.
गहनाच्या आरोपांवर सई ताम्हणकरनं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मला राजने...’
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत नुपूरने आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने आपल्या कॉलेजलाईफमधील हा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “कॉलेजमध्ये शिकत असताना माझा एक बॉयफ्रेंड होता. आम्ही शाळेपासून एकमेकांना डेट करत होतो. परंतु त्याला नंतर दुसरी कोणी मुलगी आवडली त्यामुळे त्यानं माझ्यासोबत ब्रेकअप केलं. अर्थात तो माझा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे मी काही काळ नैराश्येत गेले होते. सतत सॅड सॉन्ग ऐकायचे. आज जेव्हा या घटनेचा विचार करते तेव्हा मला स्वत:वरच खूप हसू येतं. पण तेव्हापासून मला थोडी पौढ मुलं आवडू लागली.”
हेरा फेरीचं शूटिंग कसं झालं होतं? पाहा चित्रपटाचे Cult Classic फोटो
नुपूर अलिकडेच अक्षय कुमारसोबत फिलहाल 2 या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. हा अक्षय कुमारचा पहिलाच म्युझिक अल्बम आहे. या गाण्यात पुन्हा एकदा अक्षय कुमार आणि नुपुर सेनन या दोघांचा रोमान्स आणि कमालीची केमिस्ट्री पहायला मिळाली. या व्हिडीओला काही तासांत एक कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले होते. या अल्बममुळे नुपूर रातोरात प्रकाशझोतात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.