न्युयॉर्क फिल्म फेस्टीवलमध्ये न्यूड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

न्युयॉर्क फिल्म फेस्टीवलमध्ये न्यूड ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा

18वा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव 7 ते 12 मे दरम्यान अमेरिकेत न्यूयॉर्कच्या विलेज ईस्ट सिनेमा येथे पार पडला. यात राजकुमार रावचा ओमेर्ताने महोत्सवाचा शेवट झाला.

  • Share this:

13 मे:  न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात रवी जाधव दिग्दर्शित न्यूड हा मराठी सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. तर याच चित्रपटातील अभिनेत्री कल्याणी मुळे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. याच सिनेमाने या महोत्सवाचं उद्घाटन झालं होतं.

18वा न्यूयॉर्क चित्रपट महोत्सव 7 ते 12 मे दरम्यान अमेरिकेत न्यूयॉर्कच्या विलेज ईस्ट सिनेमा येथे पार पडला. यात राजकुमार रावचा ओमेर्ताने महोत्सवाचा शेवट झाला. बेलेकॅम्पा, ज्यूझ, लाईट इन द रूम, टेक-ऑफ या चित्रपटांना मागे सारत न्यूडनं बाजी मारली. न्यूडला दोन नामांकनं होती, आणि दोन्हीमध्ये पुरस्कारही मिळाला.

गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही मराठी सिनेमांना एन्ट्री दिली होती. त्यात न्यूडला आधी एन्ट्री देऊन नंतर प्रवेश नाकारला होता. म्हणून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. नग्न चित्रकलेसाठी मॉडेल बनणाऱ्या स्त्रीयांच्या आयुष्याभोवती हा सिनेमा फिरतो.कल्याणी मुळे,  छाया कदम आणि मदन देवधर या सिनेमात प्रमुख भुमिकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2018 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...