सलमानच्या गोव्यात येण्यावर बंदी? सेल्फी प्रकरण दबंग खानला भोवणार

सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दम भरत सलमाननं त्याच्या हातातला मोबाईल हिसकावला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : अभिनेता सलमान खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. दोस्तांचा दोस्त आणि वैऱ्याचा कट्टर वैरी अशी ओळख असणारा भाईजान मीडिया असो वा चाहते सर्वांशीच मस्करीच्या मूडमध्ये बोलताना दिसतो. त्यांना सेल्फी देतो. पण आज मात्र बरोबर उटल प्रकार घडलेला दिसून आला. सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याला दम भरत सलमाननं त्याच्या हातातला मोबाईल हिसकावला. सलमानचा हा उर्मटपणा कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण असं करणं सलमानला महागात पडण्याची शक्यता आहे. गोव्यातील नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियानं सलमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

'राधे' सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान आज सकाळी या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्याच्या एका चाहत्यानं त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा आणि व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. पण सलमान खाननं रागानं त्याच्या हातातून त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला दम सुद्धा भरला. सलमानचं हे वागणं कॅमेऱ्यात कैद झालं. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.

मोदींनंतर Man v/s Wild मध्ये रजनीकांत, भयानक जंगलात ग्रिल सोबत असताना झाला अपघात

हे सर्व प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं आहे. गोव्यातील नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियानं सलमानवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जो पर्यंत सलमान त्याच्या या वर्तनाबद्दल सार्वजनिक माफी मागत नाही तोपर्यंत त्याला गोव्यात प्रवेश देऊ नये अशी मागणी केली जात आहे. NSUI चे प्रेसिडेंट अहराज मुल्ला यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सांबत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, मी तुम्हाला निवेदन करतो की तुमच्या अथॉरिटीनं या प्रकराणी गंभीर दखल घ्यावी. सलमानकडे माफीची मागणी करावी कारण सार्वजनिक ठिकाणी हा चाहत्याचा अपमान आहे. अशा प्रकारे वाईट रेकॉर्ड असणाऱ्या हिंसक अभिनेत्याला गोव्यात येण्याची परवानगी देऊ नये.

सलमानच्या ‘राधे’मधील ‘ती’ 20 मिनिटं असणार खास, भाईजाननं खर्च केलेत करोडो रुपये

सलमानचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. ज्या चाहत्यांमुळे किंवा प्रेक्षकांमुळे या कलाकारांना एवढी प्रसिद्धी आणि स्टारडम मिळतो. त्यांच्याशी या कलाकारांचं असं वागणं अतिशय निंदनीय आहे असं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. एरवी सलमानचं कौतुक करणारे त्याचे चाहते सुद्धा त्याचा हा व्हिडीओ पाहून त्याच्यावर नाराज झाले आहेत. तर काहींनी मात्र सलमानच्या वागण्याचं समर्थन करत चाहत्यांनी सुद्धा कलाकारांच्या खासगी आयुष्याच भान राखलं पाहजे. सेल्फी घेण्याआधी त्यानं सलमानला विचारलं पाहिजे होतं असं काहींचं म्हणणं आहे.

VIDEO: याड लावलं! तब्बल 15 कोटी वेळा पाहिलं गेलंय प्रियांकाचं सुपरहॉट आयटम सॉन्ग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 02:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading