आता कंगनाचा राहुल गांधींसोबत पंगा; म्हणते, मुंबई POK नाही तर सीरियाप्रमाणे...

आता कंगनाचा राहुल गांधींसोबत पंगा; म्हणते, मुंबई POK नाही तर सीरियाप्रमाणे...

संजय राऊतांनंतर आता कंगनाने राहुल गांधींविरोधात आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर : बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे बरीच चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्रीने अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजवर निशाणा साधला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडची पंगा गर्ल हिने महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) विरोधातही वक्तव्यं केली आहेत. ज्यामध्ये त्यांनी मुंबईची तुलना पीओकेसोबत केली आहे.

कंगना रनौतच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये  शिवसेना (Shiv Sena) सोबत तिचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ज्यानंतर पालिकेने तिचे मुंबईस्थित कार्यालयात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे सांगून कारवाई केली.

यानंतर अभिनेत्री कंगनाने संजय राऊत, सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. आता तिने राहुल गांधींवरही तोफ डागली आहे. कंगनाने राहुल गांधींच्या त्या वक्तव्याची तुलने आपल्या मुंबईतील पीओके म्हटलेल्या वक्तव्याशी केली. ज्यामध्ये त्यांनी भारताची तुलना सीरियासोबत केली होती. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली, मला मुंबई सुरक्षित वाटत नसल्याचे म्हटले होते, तर माझ्यासाठी अपशब्द वापरण्यात आले. माझं कार्यालयं उद्ध्वस्त केलं.

हे ही वाचा-निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळे उद्धव ठाकरेंसह आदित्य व सुप्रिया सुळेंच्या अडचणीत वाढ

कंगना पुढे म्हणते की, माझं तोंड फोडण्यात येईल अशी धमकी मला देण्यात आली होती. मला शिव्या दिल्या होत्या. अभद्र टिप्पणी केली होती. मी फक्त एवढचं म्हटलं होतं की मला मुंबई पीओके प्रमाणे वाटते. याचा फायदा उचलण्यात आला. मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी पीओके म्हटलं होतं, पण मला आता असं वाटतं की मी सीरिया म्हणायला हवं होतं. कारण जर राहुल गांधी यांनी भारताची तुलना सीरियासोबत केली होती, तेव्हा त्यांना कोणी त्रास दिला नाही, त्यांचं घर तोडलं नाही. शेवटी या लोकांना कसली अडचण आहे?

'

Published by: Meenal Gangurde
First published: September 20, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या