बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर आता जावेद अख्तर यांनीही दिला दुजोरा, म्हणाले...

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अनेक मोठ्या सेलिब्रिटांचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर :  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपाटिजमवर (Nepotism in Bollywood) मोठा वाद सुरू आहे. आतले आणि बाहेरचे असा वाद सुरू झाल्याने बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. या झगमगत्या जगाची सत्य परिस्थिती काय आहे? लोकांनी कशावर विश्वास ठेवावा, ही बाब लक्षातच येत नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर केवळ नेपोटिज्मच नाही तर ड्रग्जमुळे (Drugs) बॉलिवूड घराघरात चर्चेचा विषय बनला आहे. या दिवसात गदारोळ होत असलेल्या या विषयावर प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

जावेद अख्तर (Javed Akhtar) म्हणाले की, नेपोटिजम आणि ड्रग्ज (Nepotism and Drugs) सुशांत प्रकरणात ज्याप्रकारे ड्रग्जचं कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे बॉलिवूडची प्रतिमा पुन्हा एकदा खराब झाली आहे. विविध मुद्द्यांवर आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करणारे जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनला एक मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, मी याबाबत केवळ ऐकलं आहे. मी माझ्या डोळ्यांनी केव्हाच ड्रग्ज पाहिलं नाही. मात्र तरुण याचा वापर करतात हे मी ऐकलं आहे. ही केवळ चित्रपटसृष्टीच नाही तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते म्हणाले की मला तर हे देखील माहिती नाही की काय वैध्य व काय अवैध्य आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी व ही समस्या मूळापासून संपविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

हे ही वाचा-ड्रग्ज प्रकरणात उर्मिला मातोंडकरांच्या अडचणी वाढल्या, वकिलानं बजावली नोटीस

दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर नेपोटिजमबरोबर आता बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनबाबत मोठी चर्चा सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. या प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) सगळ्यांची कसून चौकशी करत आहे. या चौकशीत ड्रग्ज नेटवर्कचे अनेक मोठा धागेदोरे NCB हाती लागले आहेत. यातल्या मुख्य आरोपींनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुशांतसिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 19, 2020, 9:58 AM IST

ताज्या बातम्या